लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गुरुवारी ४४ नवे कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ११ हजार ४३३ झाली आहे. गुरुवारी २६ जणांनी कोरोनावर मात केल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या १०,८६० झाली आहे.गुरुवारी एकूण तपासण्यात आलेल्या ४५० संदिग्धांपैकी ४०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये पांगरी येथील एक, पिंपळगाव दोन, सागवन एक, बुलडाणा दोन, डोणगाव एक, नांदुरा एक, शेंबा बुद्रूक दोन, खामगाव दोन, धामगाव देशमुख एक, मलकापूर एक, चिखली दोन, मिसाळवाडी एक, देऊळगाव राजा चार, देऊळगाव मही एक, नागणगाव एक, सिंदखेड राजा चार, सावखेड तेजन दोन, जळपिंपळगाव एक, निंभोरा एक, जळगाव जामोद सात, शेगाव एक या प्रमाणे ४४ जण कोरोना बाधीत आढळून आले. गुरूवारी २६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा कोविड सेंटरमधून तीन, देऊळगाव राजा १७, सिंदखेड राजा एक, खामगाव कोविड सेंटरमधील चार जणांचा समावेश आहे. दरम्यान, रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण सद्या वाढत असल्याचे चित्र आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ४४ नवे पॉझिटिव्ह, २६ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 12:37 IST