शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ३५९ जणांना दिली काेविशिल्ड लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 11:58 IST

Corna Vaccine बुलडाणा केंद्रात २७, चिखली ६५, देउळगाव राजा ६९, खामगाव ६३, मलकापूर ५२ आणि शेगाव येथे ८३ जणांना काेविशिल्ड लस देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाभरात काेविशिल्डचे १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ३३९ जणांना लस देण्यात आली आहे. काेराेना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून आराेग्य कर्मचाऱ्यांना काेविशिल्ड लस देण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती आणि जि. प. उपाध्यक्षा कमल बुधवंत यांच्या उपस्थितीत काेराेना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात सहा केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. आठवड्यातून चारच दिवस लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार मंगळवारी बुलडाणा केंद्रात २७, चिखली ६५, देउळगाव राजा ६९, खामगाव ६३, मलकापूर ५२ आणि शेगाव येथे ८३ जणांना काेविशिल्ड लस देण्यात आली आहे. जिल्ह्याला काेराेनाचे १९ हजार डाेस मिळाले आहेत. पहिल्याच दिवशी सहा केंद्रांवर ६०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले हाेते. त्यापैकी ५७५ जणांना प्रत्यक्षात लस देण्यात आली. पहिल्या दिवशी लसीकरणात जिल्हा राज्यात तिसरा आला हाेता. या आठवड्यात बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी लसीकरण हाेणार आहे. १४ हजार आराेग्य कर्मचाऱ्यांनी  नाेंदणी केली आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी  घेतली कोविडची लसजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी मंगळवारी कोविडची लस घेतली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस व संबंधित व्यक्तींचे  लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लस घेतली. लस घेतल्यानंतर त्यांनी पहिल्या टप्प्यातील सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना कोविडची लस घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCorona vaccineकोरोनाची लस