शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

बुलडाणा जिल्ह्यात वाढले १३ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:01 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान असलेल्या मतदारांच्या तुलनेत त्यात १३ हजार ५१८ मतदारांची वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: विधानसभा निवडणुकीची आचार संहिता येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता असतानाच ३१ आॅगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीदरम्यान असलेल्या मतदारांच्या तुलनेत त्यात १३ हजार ५१८ मतदारांची वाढ झाली आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात २० लाख २५ हजार ९१७ मतदार होते. ते आता २० लाख ३९ हजार ४३५ वर पोहोचले आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघ सोडता अन्य मतदारसंघात किमान एक हजार ते तीन हजार ८०० दरम्यान मतदार वाढले आहेत तर बुलडाणा विधानसभेची एकूण मतदार संख्या ही तीन लाख चार हजार ९५१ वर पोहोचली असून सिंदखेड राजा मतदारसंघातील मतदारांची संख्या तीन लाख ११ हजार २६६ झाली आहे. मलकापूर विधानसभेमध्ये वर्तमान स्थितीत दोन लाख ६७ हजार ६६६ मतदार, चिखलीमध्ये दोन लाख ९४ हजार ७३, मेहकरमध्ये दोन लाख ९२ हजार ६७०, खामगावमध्ये दोन लाख ७९ हजार ७२८ आणि जळगाव जामोदमध्ये दोन लाख ८९ हजार ८१ मतदार संख्या झाली आहे. मलकापूरमध्ये ६९२, बुलडाण्यामध्ये एक हजार १६५, चिखलीमध्ये एक हजार ७३७, सिंदखेड राजामध्ये एक हजार ५३५, मेहकरमध्ये तीन हजार १६७, खामगावमध्ये एक हजार ३८४ आणि जळगाव जामोदमध्ये सर्वाधिक तीन हजार ८३८ मतदार वाढले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग