बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील मार्च ते मे २0१८ या कालावधीत मुदत ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तेराही तालुक्यांमधील रिक्त पदांच्या १0६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५0 टक्कय़ांपेक्षा कमी ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार नाही; परंतु ज्या तालुक्यात ५0 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहणार आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीच्या सीमेलगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहणार आहे. आदर्श आचारसंहिता जरी संपूर्ण जिल्हा/तालुका लगतच्या गावामध्ये लागू असेल तरी जेथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रामध्ये नसतील त्याठिकाणी विकासाच्या कामांवर कसलाही निबर्ंध राहणार नाही; मात्र याच क्षेत्रात अशी कोणतीही कृती करता येणार नाही. ज्यामुळे निवडणुका होणार्या ग्रामपंचायतीच्या मतदारांवर विपरित परिणाम पडेल. निवडणुकीची अधिसूचना २५ जानेवारी रोजी संबंधित तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणुकीकरिता नामनिर्देशनपत्र ५ फेब्रुवारी ते १0 फेब्रुवारी २0१८ पयर्ंत सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ४.३0 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. या निवडणुकीचे मतदान २५ फेब्रुवारी २0१८ रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेपयर्ंत होणार असून, मतमोजणी २६ फेब्रुवारी २0१८ रोजी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे.
बुलडाणा : १0६ ग्रामपंचायतीमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:43 AM
बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील मार्च ते मे २0१८ या कालावधीत मुदत ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्देतीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका