शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सन्मानासाठी तरी शौचालय बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:03 IST

बुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात आले. १५ सप्टेंबर ते २  आक्टोबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या अभियानाची सांगता खामगाव तालुक्यातील वरणा या अभियाना दरम्यान हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीत झाली. या प्रसंगी किमान आपल्या घरातील महिलांच्या सन्मानासाठी तरी शौचालय बांधा असे आवाहन पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.

ठळक मुद्देपालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे आवाहन स्वच्छता ही सेवा अभियानची उत्साहात सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात आले. १५ सप्टेंबर ते २  आक्टोबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या अभियानाची सांगता खामगाव तालुक्यातील वरणा या अभियाना दरम्यान हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीत झाली. या प्रसंगी किमान आपल्या घरातील महिलांच्या सन्मानासाठी तरी शौचालय बांधा असे आवाहन पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात आले. या सर्व स्तरावरील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, तसेच विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व गावकºयांचा यांचा सक्रिय सहभाग लाभला. मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या मार्गदर्शनात अभियानादरम्यान  उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. त्यामध्ये जिल्हा तसेच तालुका स्तरावरील कार्यशाळा, परीसर स्वच्छता, श्रमदान, सफाई कामगारांचा सत्कार, गृहभेटी, शौचालय बांधकामासाठी लोकांना प्रवृत्त करणे , श्रमदानातून शौचालयाचे खड्डे खोदने आदी सर्व उपक्रम राबविले. पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाची खामगाव तालुक्यात वरणा या ग्रामपंचायतीत कार्यक्रम आयोजित करून सांगता करण्यात आली. ही ग्रामपंचायत अभियान दरम्यान हागणदारीमुक्त झाली. याप्रसंगी आमदार आकाश फुंडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून आपला तालुका लवकरात लवकर हागणदारीमुक्त करावा असे प्रतिपादन केले. इतर ग्रामपंचायतीनी ही वरणा  या ग्रामपंचायत चा आदर्श घेवून आपल्या ग्रामपंचायती लवकर हागणदारीमुक्त करून तालुका डिसेंबर अखेरपर्यंत हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या. या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती, सदस्य यांचीही उपस्थिती लाभली. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी चोपडे, नरेगा गटविकास अधिकारी राजपुत, गटविकास अधिकारी शिंदे, सहायक गटविकास अधिकारी जाधव तसेच पंचायत समिती चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.       कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, गट संसाधन केंद्राचे कर्मचारी यांनी केले.