यापूर्वी देऊळगाव राजा आणि गाझीयाबाद (दिल्ली) येथे झालेल्या स्पर्धेतही विदर्भाच्या संघाने दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर आता बिहारमधील गया येथे झालेल्या या स्पर्धेत विदर्भाच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यात अमडापूरच्या मुलांचा खेळ हा चांगला झाला. त्या जोरावर हे यश विदर्भाला मिळाले आहे. विदर्भाच्या संघात अमडापूर येथील गायत्री पांडे, मेघा ईरतकर, गौरवी म्हस्के, नीलाक्षी पुरंदरे आणि अमरावती व अकोला येथील गायत्री रमेश करकरे, तन्वी डिगांबर चिखलकर, पल्लवी विनोद या मुलींचा समावेश होता. विदर्भाच्या संघाने केलेल्या या चमकदार कामगिरीबद्दल जिल्हा संघटनेचे सचिव वकील काझी, व्यवस्थापक रामदास झाडे आणि ग्रामस्थांनी महिला खेळाडूंचे कौतुक केले. शुटिंग बॉल खेळात अमडापूरच्या खेळाडूंचा नावलौकिक आहे.
शुटिंग बॉल स्पर्धेत अमडापूरच्या मुलींची चमकदार कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:34 IST