शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:40 IST

बुलडाणा : दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र ...

बुलडाणा : दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसचे वितरण केले. मात्र, गत काही महिन्यांत गॅसचे भाव गगनाला भिडल्याने तसेच सबसिडीही जवळपास बंदच झाल्याने उज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करत असल्याचे चित्र आहे.

स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच ‘बजेट’ कोलमडत आहे. त्यात पगारदार, व्यावसायिकही चिंतित असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करत चूल पेटवावी लागत आहे़ आधीच महागाई वाढत असल्याने त्यात गॅस सिलिंडरचीही भर पडली आहे़ सध्या सिलिंडर ८५५ रुपयांना मिळत असून सबसिडी बंद झाल्यातच जमा असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे़

गत काही महिन्यांपासून सिलिंडरचे भाव वाढतच आहेत़ त्यामुळे, सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट काेलमडले आहे़ आधीच कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकटे आलेली असताना त्यातच सिलिंडरचे भावही वाढले आहे़ त्यामुळे, केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावे़

मीना विजय खरात, गृहिणी

सिलिंडरचे भाव ९०० रुपयांपर्यंत पाेहोचले आहे़ दुसरीकडे सबसिडी मात्र तीन ते चार रुपये मिळत आहे़ त्यामुळे, केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावे़ तसेच सबसिडी वाढविण्याची गरज आहे.

साेनाली वैभव मगर, गृहिणी

काेराेनामुळे गतवर्षीपासून सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत़ त्यातच महागाई वाढल्याने अनेकांचे नियाेजन बिघडले आहे़ गॅसचे भावही दुप्पटीने वाढले असून मिळणारी सबसिडी बंदच झाली आहे़ त्यामुळे, सिलिंडरचे वाढलेले भाव कमी करण्याची गरज आहे़

साेनू गणेश जुनघरे, गृहिणी