शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मतदानावर बहिष्कार

By admin | Updated: October 2, 2014 23:35 IST

मेरा ग्रामस्थांचा इशारा: विविध मागण्यांकडे दूर्लक्ष

चिखली (बुलडाणा) : गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्यात यावी, विद्युत सबस्टेशन देण्यात यावे तसेच गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यात यावी या केवळ तीन जिवनावश्यक मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी याकडे दूर्लक्ष केल्यामुळे तालुक्यातील सुमारे १0 हजार लोकवस्तीच्या मेरा बु. ग्रामस्थांनी येत्या १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.सिंदखेडराजा मतदार संघात समाविष्ट असलेले चिखली तालुक्यातील मेरा बु. या गावात मुलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. येथील लोकसंख्या सुमारे १0 हजारपर्यंत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, सेवानवृत्त व वृध्दांसाठी बँकेच्या व्यवहारासाठी बाहेरगावी जावे लागत त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भूर्दंंडासह त्रास सोसावा लागत असल्याने येथे एक राष्ट्रीयकृत बँकेची शाखा असावी यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी रिझर्व बँक, एस.एल.बी.सी, जिल्हा अग्रणी बँक यांच्याकडे मागणी लावून धरली आहे. तसेच गावातील विद्युत पुरवठाही अनियमित असल्याने पाणी असूनही िपकांना पाणी देता येत नाही. परिणामी पिके वाळून शेतकर्‍यांचे नुकसान होत असून विद्यार्थ्यांंचेही शैक्षणिक नुकसान होत असल्याने येथे विद्युत सबस्टेशन देण्यात यावे. तर गावात पाणीपुरवठा व्यवस्थेअभावी येथील नागरीकांना दररोज तीन किमी पायपीट करून पाणी आणावे लागते ते सुध्द अशुध्द असल्याने गावात रोगराई वाढली आहे. ग्रामस्थांच्या उपरोक्त मागण्या रास्त व सहज पूर्ण हो तील अशा असतानाही वेळोवेळी शासनाचे उंबरठे झिजवावे लागतात. शिवाय ज्या लोकप्रतिनिधींना यांनी निवडून दिले आहे त्यांचेही ग्रामस्थांकडे साफ दूर्लक्ष असल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ईशारा ग्रामस्थांनी यापूर्वीच दिला होता. त्याचाही कुठलीच दखल न घेतल्याने मेरा ब.वासीयांनी येत्या १५ ऑक्टोबरला मतदान न करण्याचा ठराव घेतला आहे.