शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तळणीचा अट्टहास अन्यायकारक - गुप्त

By admin | Updated: April 6, 2016 00:20 IST

कृषी महाविद्यालय बुलडाणा येथेच स्थापन करण्याची मागणी.

बुलडाणा : कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या सभेतील निर्णय बेकायदेशीररीत्या फिरवून तळणी येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा अट्टहास राज्याचे कृषी व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे करीत आहेत. हा अट्टहास संशोधन, उपलब्ध सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे कृषी महाविद्यालय बुलडाणा येथे सुरू होईपर्यंंत पाठपुरावा करण्यात येणार असून, यासाठी लवकरच कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सहकार भारतीचे सतीश गुप्त यांनी देऊन शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.स्थानिक पत्रकार भवनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शासनाने मंजूर केलेले कृषी महाविद्यालय बुलडाणा येथे व्हावे, या मागणीसाठी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी सहकार भारतीचे सतीश गुप्त, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, नगराध्यक्ष टी.डी.अंभोरे, अँड.अशोक सावजी, धर्मवीर संघटनेचे संदीप गायकवाड, अँड.जितेंद्र लाहोटी, शेतकरी, शेतमजूर संघटनेचे लखन गाडेकर, सुनील सपकाळ, अँड. जयसिंग देशमुख, शशांक पंधाडे, बाळासाहेब चौधरी, बी.आर.पाटील, श्रीराम हिंगे, श्रीराम कुटे, रमेश लोखंडे आदींची उपस्थिती होती. सतीश गुप्त म्हणाले की, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या कार्यकारी परिषदेने ८ जानेवारी रोजीच्या सभेमध्ये बुलडाणा मुख्यालयी कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा ठराव घेतला आहे; परंतु महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे यांनी त्यांचे मूळ गाव तळणी येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तळणी येथे कृषी विद्यापीठाच्या मालकीची जमीन नसताना ते विद्यापीठाच्या अधिकार्‍यांवर दबाव आणत आहेत. हा अन्याय असून, विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला आहे. वास्तविक शेती संशोधनासाठी बुलडाण्याचे वातावरण पुरक असून, येथे कृषी केंद्राची मोठय़ा प्रमाणात जागा आहे. त्यामुळे आजही कृषी महाविद्यालय सुरू केल्यास सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकतात; तसेच कृषी महाविद्यालयील विद्यार्थ्यांना संधोधनाच्या, रहिवासीच्या सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकतात. याबाबत मुख्यमंत्र्यासह पालकमंत्री विविध मान्यवरांना निवेदने पाठविण्यात आली आहेत; मात्र त्या निवेदनाचे कोणीच उत्तर दिले नाही. त्यामुळे बुलडाण्याला कृषी महाविद्यालय सुरू होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रास्ताविक नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे, तर आभार सुनील सपकाळ यांनी मानले.