संग्रामपूर (बुलडाणा) : तालुक्यातून जनावरे चोरी करून विक्री करणार्या टोळीतील दोघांना संशयित म्हणून तामगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सहभागी आरोपींची माहिती मिळण्याची शक्यता आहे. तालुक्यात आतापर्यंत लाखो रूपये किमतीच्या बैलजोड्या व इतर जनावरे चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ताब्यातील आरोपींपैकी एक जण सोनाळा, तर दुसरा वाहनचालक वडोदा (ता. मुक्ताईनगर) येथील आहे. सोनाळा भागातून बैल आणि गोर्हा चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती. ही जनावरे ज्या वाहनातून नेले, त्या वाहनामध्ये बसलेल्या व्यक्तीची ओळख व गाडीचा नंबर ज्वालासिंग कनाशा फिर्यादीचे वडील यांनी सांगितले. त्यावरून तामगाव पोलिस स्टेशनचे एपीआय सचिन परदेशी यांनी संशयित म्हणून सोनाळा येथील शे. शाकीर शे. गफूर याला ३ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन पोलिस कोठडी घेतली. यातील सदर वाहनाचा क्रमांक बुलडाणा आरटीओकडून ट्रेस केल्यानंतर वडोदा (ता. मुक्ताईनगर) येथील अरुण तुकाराम झुनारे, जो एमएच२८-१४0६ या वाहनाचा चालक, याला ताब्यात घेतले.
जनावरे चोरीच्या संशयावरून दोघे ताब्यात
By admin | Updated: November 5, 2014 23:56 IST