शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

घर दोघांचे, पण नोंदणी पुरुषांच्याच नावे!

By admin | Updated: March 8, 2016 02:34 IST

सातबा-यावरही नाव देण्याची मागणी; ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी नाही.

बुलडाणा : घर दोघांचे असते ते दोघांनी सावरायचे असते..एकाने पसरवले तर दुसर्‍याने आवरायचे असते..अशा अनेक ओळींनी घरामध्ये पतिपत्नीचे महत्त्व अधोरेखित केले जाते. हे घर दोघांचे असले तरी घराची नोंदणी मात्र पुरुषांच्याच नावावर असण्याचा प्रकार सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे पतीच्या मालमत्तेत हक्क देतानाच स्त्रियांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी घर दोघांच्या नावे करण्यात यावे, असे परिपत्रक राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने २0१३ मध्ये काढले होते, त्या परिपत्रकाचीही पूर्णपणे अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याने अनेक गावांमध्ये महिलांना आर्थिक सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न प्रशासकीय उदासीनतेमुळे यशस्वी झाला नाही. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन परिपत्रक क्र.व्ही.पी.एम. २६0३/प्र.क्र. २0६८ मंत्रालय मुंबई दि.२0 नोव्हेंबर २00३ रोजी प्रसिद्ध करून घर दोघांच्या नावाने करण्याबाबत सूचित केले होते; मात्र या परिपत्रकांची अजूनही जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पूर्तता केलेली नाही. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी नमुना आठ वर नोंद घेताना पती-पत्नीच्या नावाची नोंद घेतली आहे; मात्र घर विकताना महिलेची संमती गृहित धरली जात असल्याने महिला सुरक्षिततेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. अनेकदा पतीच्या निधनानंतर पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क प्रस्तापित करताना महिलांना अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. जर आधीच पती-पत्नीच्या नावांची नोंद महसुली दप्तरात असेल तर अशा अडचणी येऊ नये, हा शासनाचा उद्देश आहे. शासनाच्या महिलाविषयक धोरणांची अंमलबजावणी पूर्णपणे झाली तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.