मोताळा: तालुक्यातील शिक्षण विभागाने प्रगतीच्या दिशेने एक पाऊल टाकण्याससुरूवात केली आहे. विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्यामुळे बोराखेडी वखेडी या दोन शाळांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. मोताळा तालुक्यातील यापहिल्याच शाळा आहेत. बोराखेडी येथील शाळा मोताळा केंद्रांतर्गत असून १ ते ८ पर्यंतचेवर्ग आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापकासह ८ शिक्षक व ३०६ विद्यार्थी संख्याआहे. खेडी येथील शाळेत मुख्याध्यापकासह ३ शिक्षक व ७५ विद्यार्थी संख्याआहे. दोन्ही शाळा शंभर टक्के उपक्रमशील असून सभारंभानुसार रांगोळीरेखाटन, शब्द वाचु सारे, मी मांडते आपले मत, गणिती खेळ, ई-लर्निंगद्वारेअध्ययन अध्यापन, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, बोलत्या भिंती, सुसज्जग्रंथालय, मातीकाम इत्यादीं उपक्रमांचे शाळेत आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर शालेय अभिलेखे, शालेय भौतिक सुविद्या अतिशय दर्जेदार करण्यात आल्याआहेत. तज्ञांसह, अधिकारी, पदाधिकारी व जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील २५००शिक्षकांनी या शाळांना वेळोवेळी भेटी देऊन विविध उपक्रमांची माहिती जाणूनघेतली आहे. विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास होण्याबरोबरच सर्वांगिण विकासव्हावा म्हणून या शाळांनी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरूवातकेल्यामुळे बोराखेडी व खेडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना आयएसओमानांकन प्राप्त झाले आहे. २४ एप्रिल रोजी सहकार विद्या मंदिर बुलडाणायेथे कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर, वस्त्रोद्योगमहामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जि.प.अध्यक्षाउमा तायडे, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी दीपा मुधोळसह सर्व सभापतीयांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते बोराखेडी व खेडी येथील जिल्हापरिषदेच्या शाळांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
बोराखेडी व खेडी शाळेस ‘आयएसओ’ मानांकन
By admin | Updated: May 1, 2017 13:59 IST