शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत उद्योजकांना १०५ कोटी रुपयांचा बूस्टर डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 10:56 IST

Buldhana News : ‘आत्मनिर्भर’ पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील लघू उद्योजकांना १०५ कोटी ११ लाख रुपयांचा बूस्टर डोस मिळाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्ग आणि गेल्या वर्षी करण्यात आलेले लॉकडाऊन, त्यानंतर दुसऱ्या लाटेदरम्यान लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांचा जिल्ह्यातील लघू व मध्यम उद्योगांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या ‘आत्मनिर्भर’ पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील लघू उद्योजकांना १०५ कोटी ११ लाख रुपयांचा बूस्टर डोस मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जवळपास २४५ सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी मिशन बिगिन अगेन अंतर्गत अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. त्या दरम्यान, मे, २०२० मध्ये केंद्रीय वित्त मंत्रालयाने देशासाठी २० लाख कोटी रुपयांचे ‘आत्मनिर्भर’ पॅकेज जाहीर केले होते. नंतर पुढे त्याची व्याप्तीही वाढविण्यात येऊन डॉक्टर, वकील सीए यांचाही यात अंतर्भाव करण्यात आला होता. त्यामुळे उद्योग व व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता. या अंतर्गतच जिल्ह्यातील उद्योजक व व्यावसायिकांना हा बूस्टर डोस मिळाला आहे. प्रामुख्याने फेब्रुवारी, २०२० अखरे व्यवसाय, उद्योगांसाठी कर्ज घेतलेल्या व्यावसायिकांचे जेवढे कर्ज बाकी आहे, त्याच्या २० टक्के पतपुरवठा हा विनातारण करण्यात येणार होता. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील २ हजार ८६७ व्यावसायिक आणि उद्योजकांना १०५ कोटी ११ लाख रुपयांचे हे विनातारण कर्ज देण्यात आले आहे. या उद्याेजक तथा व्यावसायिकांना आगामी तीन वर्षांत या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या वर्षी घेतलेल्या कर्जापोटी फक्त व्याजच द्यावे लागणार आहे. उर्वरित कर्जाचे हप्ते फेडता येतील, असेही जिल्हा अग्रणी बँकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी १ एप्रिल, २०२०  ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत जिल्ह्यातील उद्योजक तथा व्यावसायिकांना हा पतपुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योजकांचे अर्थकारण रुळावर येण्यास काही प्रमाणात मदत झाली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना