शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके

By admin | Updated: June 17, 2017 00:13 IST

पुष्पगुच्छ देऊन होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

जयदेव वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : येत्या २७ जून रोजी जिल्हा परिषद शाळा उघडणार असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याची तयारी सर्वशिक्षा अभियान प्रकल्पाने केली आहे.जळगाव जामोद तालुक्यामध्ये एकूण १०० शाळा असून काही खासगी शाळा आहेत. यामधील इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांची पाठ्यपुस्तके मोफत पुरविली जाणार आहेत. सदर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मोफत पाठ्यपुस्तके न देता त्यांच्या पालकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा शासनाचा विचार तूर्तास रद्द झाला. त्यामुळे पालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे, तर शिक्षकांना मात्र पाठ्यपुस्तक वाटपाची जबाबदारी २७ जून रोजी पार पाडावयाची आहे. सर्वशिक्षा अभियान प्रकल्प कार्यालयामार्फत १२ जूनपासूनच केंद्र स्तरावर पाठ्यपुस्तकांचे वाटप पूर्ण झाले असून शाळा स्तरावर शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप होणार आहे. पिंपळगाव काळे, खांडवी, आसलगाव, जामोद, खेर्डा, मडाखेड आणि वडशिंगी अशी सात केंदे्र असून, यांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. सर्व मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळांमध्ये पुस्तकांचा साठा भरला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी पुस्तक वाटपासाठी या शाळा सज्ज झाल्याचे दिसून येते.सातवीची पुस्तके अद्याप आली नाहीत!- इयत्ता १ ते ८ करिता ही मोफत पुस्तके असून, सर्व पुस्तके उपलब्ध आहेत; मात्र त्यापैकी इयत्ता सातवीची हिंदी, विज्ञान, भूगोल आणि इयत्ता आठवीची संस्कृत विषयाची पुस्तके अद्याप प्राप्त झालेली नाहीत. ही पुस्तके प्राप्त होताच शाळांना पुरविल्या जातील, असे प्रभारी गटसमन्वयक एम.आर. इंगळे यांनी सांगितले.- तालुक्यात उर्दू माध्यमाच्याही शाळा आहेत, तसेच सेमी इंग्लिशही बऱ्याच शाळांमध्ये सुरू झाल्याने सेमी इंग्रजीची पुस्तके सध्या उपलब्ध झालेली असल्याची माहिती देण्यात आली तर २७ जून रोजी सर्व शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे.