शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बनावट अकृषक आदेशप्रकरणी बोंद्रे बंधूंना अटक

By admin | Updated: July 1, 2017 00:27 IST

७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी: भूखंड माफियावर कारवाईचा धडाका

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शहरातील बनावट अकृषक आदेश (एन.ए.आॅर्डर) व्दारे भूखंडांची खरेदी विक्री करून लाखो रूपयांचा मलिदा लाटण्याऱ्या भूखंड माफीयांवर पोलिस कारवाईचा धडाका सुरूच असून या प्रकरणात आतापर्यंत तीघांना अटक होवून पोलिस कोठडी मिळालेली आहे. याच प्रकरणातील उर्वरित १४ भूखंड धारकांपैकी आशिष उर्फ बाळू शरदचंद्र बोंद्रे व विश्वजित जनार्दन बोंद्रे या दोघांनी २९ जून रोजी चिखली पोलिसांत शरणागती पत्करली आहे. दरम्यान चिखली न्यायालयाने या दोघांना ७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.बनावट अकृषक आदेश प्रकरणी चिखली पोलिसांनी अटक केलेल्या तत्कालीन तलाठी रियाज शेख व उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयातील तत्कालीन स्टेनो विजय गोविंदराव जाधव व त्याचा खासगी एजंट सचिन उर्फ पप्पु दिनकरराव देशमुख या तीघांच्या पोलिस कोठडीत ४ दिवसांची वाढ झाली आहे. तर या प्रकरणातील आणखी दोन भूखंड माफीया आशिष बोंद्रे व विश्वजित बोंद्रे यांनी २९ जून रोजी रात्री उशीरा चिखली पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. दरम्यान ३० जून रोजी या दोघांना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या दोघांना ७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान याप्रकरणात अटकेतील बोंद्रे बंधूंनी बनावट अकृषक आदेश कुठे बनविले त्याची माहिती पोलिस कोठडी दरम्यान मिळाल्यानंतर बनावटी साहित्य जप्त करण्याची कारवाई तसेच बनावट आदेशाचा वापर करून या दोघांनी १०५ प्लॉटची विक्री केली की कसे? याचाही शोध घेण्यात येईल आणि या प्रकरणातील इतर आरोपींचे अटकसत्र सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी एपीआय विक्रांत पाटील यांनी दिली आहे. पालिकेचे ६९ हजार ९०० रूपयांच्या फसवणूक प्रकरणीही गुन्हा दाखल आहेचिखली पोलिसांसमोर शरणागती पत्करलेल्या बोंद्रे बंधुनी खुद्द नगर पालिकेलाही बनावट अकृषक आदेशाव्दारे भूखंडांची विक्री करण्याचा सौदा करून पालिकेचीही ६९ हजार ९०० रूपयांचे आर्थिक नुकसान करून फसवणूक केली आहे. चिखली नगर पालिकेने खरेदीचा सौदा केलेले भूखंड बोगस कागदपत्राव्दारे झाल्याची तक्रार झाल्यानंतर याबाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी पालिकेने उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यावरून कागदपत्रांची पडताळणी झाली असता या पालिकेने खरेदी केलेल्या भूखंडाच्या खरेदीखतात वापरण्यात आलेले अकृषक आदेश रे.क.नंबर एनएपी-३४/३८/२०१०-२०११ निकाल दिनांक ६ जुलै २०११ हे प्रकरण उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयात कधीही दाखल करण्यात आलेले नव्हते व नाही, असा निर्वाळा उपविभागीय अधिकारी कार्यालयाने दिला होता. त्यामुळे पालिकेचे ६९ हजार ९०० रूपयांचे आर्थिक नुकसान झाले असून याप्रकरणात पालिकेच्या फिर्यादीवर पोलिसांनी आशिष बोंद्रे व विश्वजित बोंद्रे यांच्या विरूध्द कमल ४२०, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल आहे.