शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदाता निगेटिव्ह.. मन मात्र पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 02:08 IST

निगेटिव्ह रक्तदात्यांची संख्या अत्यंत कमी असतानाही रक्तदानासाठी समोर येत आहेत.

फहीम देशमुख / शेगावनिगेटिव्ह रक्तदात्यांची संख्या अत्यंत कमी असतानाही असे रक्तदाते मात्र पॉझिटिव्ह मन करीत रक्तदानासाठी समोर येत आहेत. त्यामुळे इतर गटातील रक्तांसह निगेटिव्ह रक्तही मिळायला लागल्याने निगेटिव्ह रक्ताची गरज असलेल्या रुग्णांचे जीव वाचविण्यात आरोग्य विभागाला यश प्राप्त होत आहे. दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यासोबतच दुर्धर आजारांच्या संख्येतही वाढ झाली असल्याने अशा रुग्णांना गरज भासते ती रक्ताची. अशावेळी प्रचार, प्रसार व प्रबोधन करून शिबिरे घेण्यास प्रवृत्त केले जाते. त्यातून मोठय़ा प्रमाणात रक्तसाठा होत असला तरी समाजातील चारही प्रवर्गातील निगेटिव्ह रक्त असणारी माणसे कमी आहे त. त्यामुळे या रक्ताचा साठा तुरळक असतो. शिवाय अशा रक्तासाठी मोठमोठय़ा शहरांकडे धाव घ्यावी लागते. रक्तपेढय़ांमध्ये नेहमीच उद्भवणार्‍या समस्येतून शेगावात मात्र याचा मार्ग काढला गेला आहे. येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय व खामगाव शहरातील रक्तपेढय़ांनी निगेटिव्ह रक्तदात्यांची यादी तयार केलेली आहे. अनेकांनी ही यादी संगणकीकृत केलेली आहे. यामध्ये संबंधित रक्तदात्याचे नाव, पत्ता व फोन नंबर संग्रहीत केलेले आहेत. गरज भासेल तेव्हा अशा व्यक्तींना बोलावून त्यांना रक्तदान करण्यास सांगितले जाते. रक्तदातेही कुठलाही आव न आणता अशावेळी रक्तदान करतात. यावरून असे रक्तदात्यांचे रक्त निगेटिव्ह असले तरी मन मात्र पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येते. आपल्या रक्तामुळे कुणाचे प्राण वाचू शकतात, याचे आत्मिक समाधान मिळवून घेण्यासाठी हे रक्तदाते समोर येतात.