२७ डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २५ डिसेंबरला सकाळी ९ वाजता संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. २६ डिसेंबरला विविध ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ऑनलाइन पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. २७ डिसेंबरला भाऊसाहेब जयंतीनिमित्त व महाराष्ट्र शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयात बुलडाणा येथील चमूच्या सहकार्याने करण्यात आले व राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील मामलकर होते. प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.धुमाळ, प्रा.मेहेरकर होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा. ढगे, प्रा.किरोचे, प्रा.हिरनवळे, डॉ. ठेंग, प्रा.भिसे, प्रा.राहाटे, प्रा. मनगटे, प्रा.साखरे, प्रा. चन्नेकर, प्रा.ब्राह्मणकर, प्रा. गायकी, डॉ. ठाकूर डॉ.गवारे, डॉ.बेहेरे, डॉ.मोरे, डॉ.उके, प्रा.बनकर शिराळ, देशमुख, कुयटे, खाडे, धुरंधर, गवई यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.चाटे यांनी केले, तर आभार प्रा.गट्टूवार यांनी मानले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी समीर शेख, प्रतीक पाचपांडे, विशाल वले, दीपक इंगळे, अविनाश मेडकर व विजय दळवी या रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST