शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मंडळनिहाय निकषाचा शेतक-यांना फटका

By admin | Updated: June 4, 2016 02:43 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ८६ हजार शेतकरी मदतीपासून वंचित.

गणेश मापारी / खामगावखरिपातील मूग, उडिदाच्या पिकाची 'माती' झाली, तर सोयाबीनचे उत्पादनही घटले. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांची आशा असलेल्या पीक विम्यानेही त्यांचा घात केला आहे. पीक विमा देताना मंडळनिहाय निकष ठेवल्यामुळे एकाच जिल्ह्यातील शेती आणि शेतकरी असतानाही, ८६ हजार शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना करीत असले तरी अनेक शासकीय धोरणांचे भूत शेतकर्‍यांच्या मानगुटीवरच बसलेले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादनात होणारी घट पाहता, अनेक शेतकरी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांचा पीक विमा उतरवितात. ज्वारी, तूर, मूग, उडिद, सोयाबीन, तीळ, कापूस आणि भुईमूग या खरिपातील पिकांसाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून ३ लाख ६३ हजार २४६ शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला. यापैकी २ लाख ७६ हजार ९0८ शेतकर्‍यांचाच पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ८६ हजार ३३८ शेतकर्‍यांना पीक विम्याच्या मोबदल्यात कोणतीही मदत मिळणार नाही. ही संख्या मोठी असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. कर्मचार्‍यांचीही डोकेदुखीमहसूल मंडळातील सरासरी उत्पन्न, उंबरठा उत्पन्न यावरून संबंधित महसूल मंडळातील नुकसान ठरविण्यात येते. या प्रकारामुळे एकाच भागातील शेतीला शेती लागून असलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीतही मोठी तफावत राहते. एका शेतकर्‍याला विम्याची मदत मिळते, तर लगतच्या शेतकर्‍याला मात्र विम्याची रक्कम नाकारली जाते. हा प्रकार शासनाने लावून दिलेल्या धोरणामुळे होत असून, शेतकर्‍यांप्रमाणेच कर्मचार्‍यांचीही यामुळे चांगलीच डोकेदुखी होते.जोखीम स्तराबाबत शेतकरी अनभिज्ञराष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पिकांचा जोखीम स्तर महत्त्वाचा आहे. बहुतांश शेतकर्‍यांना जोखीम स्तराबाबत माहिती नसल्यामुळेही मदतीच्या रकमेत तफावत राहते. यापुढे शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यामुळे संबंधित योजनेबाबत शेतकर्‍यांना पूर्ण मार्गदर्शन करण्याची गरज आहे.