शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सीमावर्ती भागात नाकेबंदी

By admin | Updated: June 26, 2015 01:32 IST

राज्यात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३० जून आणि ४ जुलै रोजी मतदान होणार आहे.

जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी : निवडणूकसंबंधी आंतरराज्य सीमा बैठक गोंदिया : राज्यात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३० जून आणि ४ जुलै रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आंररराज्य नाकेबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आंतरराज्य सीमा बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. बैठकीला भंडारा जिल्हाधिकारी धीरजकुमार, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, राजनांदगावचे (छत्तीसगड) अप्पर जिल्हाधिकारी के.आर. उगले, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, बालाघाटचे (मध्य प्रदेश) अप्पर पोलीस अधीक्षक नीरज सोनी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, राजनांदगावचे (छत्तीसगड) अप्पर पोलीस अधीक्षक वाय.पी. सिंग, भंडारा अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, लांजीचे (मध्य प्रदेश) उपविभागीय पोलीस अधिकारी जी.एस. वर्धमान आणि कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांढरकर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी उमेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, निवडणुकीच्या काळात गोंदिया व भंडारा जिल्ह्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतून प्रवेश करणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी. बालाघाट व राजनांदगावच्या सीमावर्ती भागात विशेष लक्ष द्यावे. सीमावर्ती भागातून जिल्ह्यात मद्य पुरवठा होणार नाही, याची काळजी घ्यावी. २९ व ३० जूनला गोंदिया जिल्ह्यात, ३ व ४ जुलैला भंडारा जिल्ह्यात मतदान व ६ जुलै रोजी दोन्ही जिल्ह्यात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे परवानाधारक मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार असल्यामुळे या दिवशी मद्यविक्री होणार नाही. तसेच चोरट्या मार्गाने दारू येणार नाही याची दक्षता घ्यावी.मतदानासाठी मतदारांना कुणी पैसे व दारुचे आमिष दाखवित असेल तर संबंधितांची माहिती द्यावी असे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, मतदानाच्या वेळी कुणीही बोगस मतदान करणार नाही याकडे विशेष लक्ष असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, दोन्ही जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात असावा. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्राकडे पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.राजनांदगाव, बालाघाट आणि गडचिरोली जिल्ह्यातून बैठकीला आलेल्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील निवडणूकीच्या काळात सीमावर्ती भागात आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)