शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अंध युवक-युवती विवाह बंधनात!

By admin | Updated: March 15, 2017 01:09 IST

सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने जुळली दोन मने!

चिखली, दि. १४- आयुष्यात प्रत्येक तरूण-तरूणीचे एक स्वप्न असते. ते म्हणजे, योग्य जोडीदार शोधून आपला सुखाचा संसार थाटणं. असेच स्वप्न पाहणार्‍या एका अंध जोडप्यांना जाती-पातीच्या बंधनात अडकवून न ठेवता त्यांना एकमेकांच्या लग्न बेडीत अडकवून दोघांच्याही जीवनाला डोळस दिशा देण्याचे काम येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने झाले आहे.स्थानिक गजानन नगर स्थित पंचशील बुध्द विहारमध्ये ६ मार्च रोजी जन्मत: अंध असलेले बंडू खासबागे व कोमल खरात हे दोघे जण विवाह बंधनात अडकले. यातील कोमल ही तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील ङ्म्रीधर खरात यांची मुलगी आहे तर बंडू हा मांगुळ झनक ता.रिसोड येथील सूर्यभान खासबागे यांचा मुलगा आहे. अंध असल्यामुळे दोघांच्याही कुटुंबियांना त्यांच्या लग्नाविषयी चिंता वाटत होती. दरम्यान अंध असलेला बंडू हा मंगरूळ नवघरे येथे आपल्यासारख्याच अंध असलेल्या खरात नामक मित्राच्या भेटीला नेहमी येत असतो. या भेटीदरम्यान खरात याने बंडूचा स्वभाव जाणून घेत नात्याने त्याची बहीण असलेल्या कोमलशी बंडूने विवाह करावा, अशी त्याची इच्छा होती. त्यादृष्टीने त्याने प्रयत्न चालविले होते. तसेच कोमल व बंडूची भेट घालून देत संवाद साधल्यानंतर दोघेही लग्नासाठी तयार झाले. दरम्यान, याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय दाभाडे व किशोर कदम यांना मिळाल्याने या दोघांच्या विवाहासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि बंडू सूर्यभान खासबागे व कोमल श्रीधर खरात या अंध जोडप्याचा आदर्श पद्धतीने विवाह पार पडला. यावेळी अँड. अरूण गवई, प्रीतम मिसाळ, यशवंत शिनगारे, जयदेव मघाडे, संजय पवार, भीमराव जाधव, शेषराव घेवंदे, भारत पवार, युवराज दाभाडे, विशाल दाभाडे, गजानन जाधव, सुधीर जाधव, देवीदास खरात, अंभोरे, वर-वधूकडील नातेनाईक व नागरिकांची बहुसंख्य उपस्थिती होती. या विवाह सोहळय़ासाठी उपस्थित वर्‍हाडींच्या जेवणाची व्यवस्था संजय दाभाडे यांनी केली. सदर विवाह पार पाडण्यासाठी किशोद कदम, संजय दाभाडे यांच्यासह अंध युवकानेही सक्रिय भूमिका बजाविल्याने अंध कोमल व बंडूच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली आहे.