शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

योजनेपासून अंध वंचित!

By admin | Updated: March 15, 2017 01:17 IST

शासनाकडून होते दुर्लक्ष; सहा महिन्यांत २२८ अर्जदार ठरले अपात्र

बुलडाणा, दि. १४- जिल्ह्यात गत ५ वर्षात नोंदविण्यात आलेली दिव्यांगांची संख्या १ लाख १८ हजार ७२३ आहे. यात १८ हजार ९६५ अंध नागरिकांचा समावेश आहे. अंध नागरिकांना आधार देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात; मात्र आरोग्य विभागाच्या विविध कसोट्यांवर खरे न उतरल्यामुळे सहा महिन्यात २२८ दृष्टिदोष असलेल्या नागरिकांना विविध शासकीय सवलतीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात दिव्यांग आणि दृष्टीदोषांचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासकीय सवलती लाटणार्‍यांची व नोकरी मिळविणार्‍यांची संख्या मोठी आहे; मात्र खरे अंधांना मात्र अद्यापही प्रशासनाकडून सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविले जाते. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या बुधवारी अपंग बोर्डच्यावतीने तपासणी करून अंध व दुष्टीदोष असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते. गत सहा महिन्यात जिल्ह्याभरातील ५५८ दृष्टीदोष व अंधत्व असलेल्या नागरिकांनी केंद्रांकडे अर्ज केले होते. विविध नियमांच्या कसोट्यांवर पारख करुन ३३0 नागरिकांना अंधत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले, तर निकषात न बसलेल्या २२८ नागरिकांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले, त्यामुळे या नागरिकांना अद्यापही प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे विविध शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.