शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत उपकेंद्राच्या काचा फोडल्या; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:47 IST

डोणगाव: जवळच असलेल्या ग्राम लोणीगवळी येथे विद्युत वितरण कंपनीचे ३३ के.व्ही. उपकेंद्र आहे. त्या उपकेंद्रावर कार्यरत कर्मचार्‍यास बाहेर काढून उपकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडित करून खिडकीच्या काचा फोडल्याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देकर्मचार्‍यास बाहेर काढून प्रथम खंडित केला विद्युत पुरवठा ग्राम लोणीगवळी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: जवळच असलेल्या ग्राम लोणीगवळी येथे विद्युत वितरण कंपनीचे ३३ के.व्ही. उपकेंद्र आहे. त्या उपकेंद्रावर कार्यरत कर्मचार्‍यास बाहेर काढून उपकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडित करून खिडकीच्या काचा फोडल्याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.लोणी गवळी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावर यंत्रचालक संतोष दामोधर डोंबळे हे २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजताच्या दरम्यान कर्तव्यावर असताना आरोपी राजू सदाशिव चंदनशिव रा. भोसा व शंकर दगडू सौभागे रा. लोणीगवळी हे उपकेंद्रावर आले व संतोष डोंबळे यांना आमच्या गावची वीज नेहमी राहत नाही, वारंवार डीपी जळते याचे कारण काय, तुम्ही पॉवर हाऊसच्या बाहेर निघा, आम्हाला वीज बंद करायची आहे, असे म्हणून संतोष डोंबळे यांना बाहेर काढले व उपकेंद्रातील प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन कोणीतरी बटण दाबून वीजपुरवठा खंडित केला व नियंत्रण कक्षाच्या तीन खिडक्यांच्या काचा फोडून उपकेंद्राचे ८ हजार रुपयांचे नुकसान केले. सदर बाब वरिष्ठ अधिकारी दीपक मालोकार व बुगदाणे यांना कळविताच त्यांनी आरोपींना समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतु आरोपींनी मालोकार यांचे न ऐकता त्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनानुसार ३ सप्टेंबर रोजी संतोष दामोधर डोंबळे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनला कलम ३५३, ५0४, ५0६, ३४ भादंवि व कलम ३ पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एएसआय झोरे करीत आहेत.