शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसचे पंतप्रधानांना काळे निवेदन

By admin | Updated: August 23, 2016 01:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे निवेदन पाठविण्यात आले.

बुलडाणा, दि. २२: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निघरुण खुनाला ३६ महिने पूर्ण झाल्यावरही तपास कार्यास गती प्राप्त होत नाही, याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने बुलडाणा शहरातील विविध संस्था, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यां मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे निवेदन देण्यात आले. डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे आणि प्रा.डॉ.एम.एम.कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांची रेखाचित्रे ही राज्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावी, तसेच सारंग अकोलकर, प्रवीण निंबकर, रूद्र पाटील व जयप्रकाश हेगडे या एन.आय.ए.ला हवे असलेल्या सनातन संस्थेच्या फरार साधकांचे एन.आय.ए.च्या वेबसाईटवरील फोटो राज्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना प्रामुख्याने डॉ.गणेश गायकवाड, प्रा.सुनील देशमुख, मीनल आंबेकर, नरेंद्र लांजेवार, प्रदीप हिवाळे, दत्ताभाऊ सिरसाट, शाहिना पठाण, मृणालीनी सपकाळ, प्रतिभा भुतेकर, अँड. हरिदास उंबरकर, पत्रकार रणजीतसिंग राजपूत, शिवाजी पाटील, राम बारोटे, सुरेश साबळे, सुनील सपकाळ, प्रशांत सोनुने, काशीराम बावस्कर, आकाश दळवी, सुधीर देशमुख, प्रा.डॉ.संतोष आंबेकर, गंगाराम चिंचोले, राजू जाधव, महेंद्र सौभागे, अजय दराखे, प्रशांत शेकोकार, सुरेश धनवे, सुरेश सरकटे, संजिवनी शेळके, अविनाश चव्हाण इ. प्रामुख्याने उपस्थित होते.