शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

काळी-पिवळी उलटून पाच जखमी

By admin | Updated: July 5, 2016 01:04 IST

मोताळा-नांदुरा मार्गावरील घटनेत पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली.

मोताळा (जि. बुलडाणा): : मोताळा-नांदुरा मार्गावरील सबस्टेशननजिक सायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात काळी-पिवळीवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना सोमवारी १२ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात काळी-पिवळी सायकलस्वारास धडक देऊन रस्त्यालगतच्या खडड्य़ात कोसळली. जीवितहानी झाली नसली तरी सायकलस्वारासह काळी-पिवळीमधील पाच प्रवासी जखमी झाले. जखमींना बुलडाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. चिंचपूर येथील संदीप मापारी हे ४ जुलै रोजी काळी-पिवळी (एम.एच.२८ एच.३३२२) मध्ये प्रवासी घेऊन १२ वाजेच्या सुमारास नांदुर्‍याकडे जात होते. मोताळा सबस्टेशनजवळ अचानक काळी-पिवळीसमोर सायकलस्वार आल्याने, त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले व काळी-पिवळी सायकलस्वारास धडक देऊन रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात सायकलस्वार सै. इमरान सै. इसहाक (वय १४) रा. मोताळा व काळी-पिवळीमधील संगीता रमाकांत उचाडे (वय ४0) रा. उमरा, कलावती मुरलीधर डामरे (वय ६२) रा. नायगाव, प्रवीण प्रल्हाद जाधव (वय १७) रा. फर्दापूर व चालक संदीप मापारी हे पाच जण जखमी झाले. अपघातात सायकलस्वार सै. इमरान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी जखमींना ताबडतोब स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी डॉ. जैस्वाल व डॉ.जोशी यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. घटनास्थळी बोराखेडी पोलीस पाहणी करताना आढळून आले. मात्र वृत्त लिहिपर्यंंत पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद झाली नव्हती.