शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची जोरदार मुसंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 02:21 IST

बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजपने ६0 पैकी २४ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे.

बुलडाणा, दि. २३-काँग्रेसचा अभेद्य गड समजल्या जाणार्‍या बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजपने ६0 पैकी २४ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. या पक्षाला पहिल्यांदाच सत्ता स्थापन करण्याची संधी असून, बहुमतासाठी केवळ सात सदस्यांची आवश्यकता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेची पीछेहाट झाल्याचे चित्र निवडणुकीत स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या ६0 गटांसाठी व पंचायत समितीच्या १२0 गणांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार, याबाबत उत्सुकता होती. गुरुवारी सकाळी १0 वाजता १३ तालुक्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. गतवेळी केवळ चार जागा असलेल्या भाजपने जोरदार मुसंडी मारत तब्बल २४ जागा पटकावल्या. भाजपच्या संख्याबळात तब्बल सहा पट वाढ झाली आहे. गतवेळी काँग्रेसच्या २२ जागा होत्या. यावेळी काँग्रेसला १३ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला नऊ जागांवर पराभव पत्करावा लागला. गतवेळी १४ जागा असलेल्या शिवसेनेचे यावेळी १0 उमेदवार विजयी झाले. शिवसेनेलाही चार जागा गमवाव्या लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसलाही या निवडणुकीत दोन जागांचा फटका बसला आहे. भारिप-बमसंचे गतवेळी चार सदस्य होते. यावेळी भारिपलाही दोन जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. भारिपला दोन जागा मिळाल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना यावेळी मैदानात उतरली होती; परंतु त्यांना खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीत शिवसेनच्या प्रचाराची धुरा सांभाळणार्‍या खासदार प्रतापराव जाधव यांचा मुलगा ऋषी जाधव मेहकर तालुक्यातील डोमरूळ जि.प. गटामध्ये पराभूत झाला. या गटात पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक संजय वडतकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवून विजय मिळवला, हे विशेष. या निवडणुकीत भाजप बाजी मारेल, असा अंदाज अनेकांनी वर्तविला होता. भाजप वगळता सर्वच पक्षांच्या जागा कमी झाल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.