शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपवाल्यांना सत्तेचा माज चढला - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:39 IST

शेगाव:  भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू  समिती तयार करण्यात आली, अशा शब्दात कृषिमंत्री पांडुरंग  फुंडकर यांनी सुकाणू समितीवर ताशेरे ओढले त्यामुळे भाज पवाल्यांना सत्तेचा माज चढलेला आहे, अशा शब्दात सुकाणू  समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला  चढविला.

ठळक मुद्देसुकाणू  समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला  चढविलासातव्या वेतन आयोगापेक्षा कर्जमाफी द्या! 

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव:  भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू  समिती तयार करण्यात आली, अशा शब्दात कृषिमंत्री पांडुरंग  फुंडकर यांनी सुकाणू समितीवर ताशेरे ओढले त्यामुळे भाज पवाल्यांना सत्तेचा माज चढलेला आहे, अशा शब्दात सुकाणू  समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला  चढविला.शनिवारी कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी भाजपा  किसान आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात चिखली येथे सुकाणू समि तीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की,  आंदोलनवेळी   सुकाणू समितीने शेतकर्‍यांचा माल रस्त्यावर टाकला त्यामुळे  त्यांची एकप्रकारे लूटच करण्यात आली, तर स्वातंत्र्यदिनी  पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखणे हा देशद्रोहाचा गुन्हाच  आहे. कायदा का यांच्या घरचा आहे का, असा प्रश्नही त्यांनी  यावेळी केला. यावर रविवारी सुकाणू समितीचे सदस्य तथा  आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना शेगावात हल्ला  चढविला. ते म्हणाले की, भाजपावाल्यांना सत्तेचा अहंकार व  सत्तेची मस्ती आहे. शेतकर्‍यांबाबत फुंडकरांना कवडीचेही ज्ञान  नाही. शेतकर्‍यांचे ठिबकाचे अनुदान दोन वर्षांपासून दिलेले नाही.  दोनशे रुपये सोयाबीनचे अजून भेटले नाही. तूर अजूनही  लोकांच्या घरात पडलेली आहे. तेव्हा कोठे गेली होती तुमची  र्मदानगी? आम्हाला  देशद्रोही म्हणणार्‍या फुंडकरांनी हिंमत असेल  तर राजीनामा देऊन यावे. आपण दोघेही देशाच्या सीमेवर जाऊन  तेथे दाखवू देशभक्ती काय असते ती. आम्हाला भंगार म्हणणारे  फुंडकर हे मोदींच्या ताकदीवर निवडून आले. असली र्मद असाल  तर बगर कमळाचे या मैदानात, असे आव्हानही त्यांनी दिले. या  संदर्भात भाऊसाहेब फुंडकर यांच्याशी संपर्क साधला असता तो  होवू शकला नाही. 

सातव्या वेतन आयोगापेक्षा कर्जमाफी द्या! नांदुरा: शासकीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग  विलंबाने  दिला तर एकही शासकीय कर्मचारी आत्महत्या करणार नाही; मात्र  शासनाच्या फसव्या कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या  असून, शासनाने आधी सरसकट कर्जमाफी द्यावी व नंतर सातवा  वेतन आयोग लागू करावा, असे प्रतिपादन अचलपूर मतदारसंघाचे  आमदार बच्चू कडू यांनी २0 ऑगस्ट रोजी येथे केले. शहरातील  शेतकरी पुत्र अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना ते बोल त होते. प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे नांदुरा तालुक्यातील बेलुरा ये थील सभेसाठी जात असताना कृउबास संचालक राजेश गावंडे  यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारा संचालित शेतकरी पुत्र  अभ्यासिकेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची विनंती  केली होती. त्यानुसार आमदार बच्चू कडू यांनी तासभर विद्या र्थ्यांंसोबत संवाद साधला. यावेळी बाजार समितीचे संचालक मोहन  पाटील, संतोष मुंडे, अनिल इंगळे, राजेश गावंडे व प्रभारी सचिव  वा. म. भोंगे आदींची उपस्थिती होती.