शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

घाटाखालील चार पंचायत समितींवर भाजपचा झेंडा

By admin | Updated: March 15, 2017 01:48 IST

शेगाव पंचायत समितीवर भारिप-बहुजन महासंघाने झेंडा फडकविला.

खामगाव, दि. १४- घाटाखालील सहापैकी चार पंचायत समित्यांवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले असून, एका पंचायत समितीवर भारिप-बहुजन महासंघाने झेंडा फडकविला आहे. दरम्यान, नांदुरा पंचायत समितीमध्ये भाजप-सेनेच्या मदतीने काँग्रेसचा सभापती विजयी झाला, तर उपसभापतीपदी शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. घाटाखालील सहाही पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीसाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समितीवर २५ वर्षानंतर भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. १४ सदस्य संख्या असलेल्या खामगाव पंचायत समितीमध्ये भाजपने १0 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे मंगळवारी भाजपच्या उर्मिला गायकी यांची सभापतीपदी तर भगवानसिंह सोळंके यांची उपसभापती निवड झाली, तर जळगाव जामोद पंचायत समितीवरही अपेक्षेप्रमाणे भाजपच्या गीताताई बंडल सभापती तर रामेश्‍वर राऊत उपसभापतीपदी विजयी झाले. त्याचप्रमाणे मलकापूर पंचायत समितीवर सभापतीपदी संगीता तायडे (पाटील) तर उपसभापतीपदी सीमा बगारे यांची अविरोध निवड करण्यात आली. संग्रामपूर पंचायत समितीवरदेखील ईश्‍वर चिठ्ठीचा कौलदेखील भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात पडला. समान मतांमुळे या ठिकाणी ईश्‍वर चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये सभापतीपदी तुळसाबाई वाघ तर उपसभापती उज्ज्वला घायल यांना विजयी घोषित करण्यात आले. शेगाव पंचायत समिती भारिपच्या ताब्यातशेगाव पंचायत समितीमध्ये भारिप-बहुजन महासंघाने कॉंग्रेसला सोबत घेत निवडणूक लढली. यामध्ये सभापतीपदी विठ्ठल भास्करराव पाटील तर उपसभापतीपदी शालिनी सुखदेव सोनोने यांची निवड झाली. नांदुर्‍यात काँग्रेसचा सभापतीनांदुरा पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या अर्चनाताई शिवाजीराव पाटील यांनी भाजपा-शिवसेना सदस्यांच्या संख्याबळावर काँग्रेसच्या नीताताई भगवान धांडे यांचा पाच विरुद्ध तीन मतांनी पराभव केला, तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या सुनीताताई संतोष डिवरे यांची अविरोध निवड झाली.