शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, सेनेचे उमेदवार जाहीर

By admin | Updated: October 22, 2016 02:35 IST

दोन्ही पक्षाकडून वर्तविली जात आहे वाटाघाटीची शक्यता

जळगाव जामोद, दि. २१- भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.डॉ.संजय कुटे यांनी भाजपा कार्यकर्त्यांंंच्या बैठकीत कौल घेत नगरसेवक कैलास डोबे यांच्या पत्नी सीमा डोबे यांची भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी शुक्रवारी जाहीर केली, तर शिवसेनेने विद्यमान नगरसेविका द्रोपदा शालीग्राम हागे यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. या दोन्ही पक्षांकडून भविष्यात वाटाघाटी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जळगाव जामोदचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलासाठी राखीव असून, निवडणूक जाहीर झाल्यानंतर या पदासाठी विविध पक्षांकडून कोणत्या महिलांची नावे समोर येतात, याबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता होती. शुक्रवार, २१ ऑक्टोबर रोजी भाजपाने सीमा कैलास डोबे व शिवसेनेचे द्रोपदाबाई शालीग्राम हागे यांच्या नावाची घोषणा केली. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उषा संजय ढगे यांचे नाव जाहीर झाल्याचे समजते. विशेष म्हणजे या नगराध्यक्षपदासाठी जाहीर झालेल्या तीनही महिला एकाच समाजाच्या आहेत. भाजपा-सेनेने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शुक्रवारी जाहीर केले असले, तरी नगरसेवक पदाचे उमेदवार मात्र अद्याप कोणी जाहीर केले नाही. काँग्रेससह भारिप-बमसं व समाजवादी पार्टी यांचेही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अद्याप जाहीर होणे बाकी आहे. भविष्यात युती व आघाडी होणार की नाही, याचे उत्तर सध्या देणे कठीण आहे. निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली असून, नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याचीही आकडेमोड मतदार करीत आहेत. हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत निवडणुकीच्या वातावरणाने रंगत आणली आहे. शेवटी मतदार कोणाच्या दिशेने कौल देतो, हे मतमोजणीनंतर समजत असले, तरी निश्‍चित झालेले प्रत्येक उमेदवार आपल्या यशाची शाश्‍वती देत आहे.