खामगाव, दि. ८- शिकवणी वर्गावरून घरी परतणार्या विद्यार्थ्यास मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना अमृतनगर भागात घडली. गोपाल हरिश्चंद्र भुसारे (वय २१) हा मंगळवारी संध्याकाळी अमृनगर भागातून शिकवणी वर्ग सुटल्यानंतर घरी परत जात असताना मोकाट कुत्र्याने त्याच्या पायाला चावा घेतला. त्यास उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. शहरात मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, नगर परिषदेने अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कुत्र्याने घेतला विद्यार्थ्यास चावा
By admin | Updated: March 9, 2017 01:45 IST