सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरा फाटा, पिंपळगाव कुडा या ठिकाणी बायोगॅस प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरा फाटा, पिंपळगाव कुडा या ठिकाणी भूमिपूजन सोहळा २३ जानेवारी रोजी पार पडला. यावेळी कंपनीचे प्रमुख कार्तिक रावल, ईश्वर बायोटेकचे संजय वायाळ, अर्चना गजानन झोरे, दमयंती शेवाळे, माजी उपनगराध्यक्ष जगन राव ठाकरे, पिंपळगाव कुडाचे सरपंच वैजनाथ कुडे, तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड, प्राचार्य विजय नागरे, खुशालराव जाधव, प्रशांत ठमके, प्रा. डॉ. मारोतराव गव्हाणे, शहाजी चौधरी, आतिश झोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ईश्वर बायोटेकचे संचालक संजय वायाळ यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कार्तिक रावल यांनी बायोगॅस प्रकल्पाबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
पालकमंत्री डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. हा प्रकल्प सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून हा प्रकल्प माझ्या मतदारसंघात सुरू होत आहेत याचा मला अभिमान आहे. सरकारचे काम करते त्याला हातभार लावण्याचे काम या कंपनीकडून होत आहे. या कंपनीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून बायोगॅस ही आताची महत्त्वपूर्ण गरज आहे. भारतातील मोठ्या प्रमाणात पैसा इंधनावर खर्च होतो. त्या इंधन निर्मिती आता आपल्या मतदारसंघात होत असून ही गौरवाची बाब आहे. या कंपनीचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी केले. या प्रास्ताविक गजानन झोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. लक्ष्मण म्हस्के यांनी मानले. संचालन अजिम नवाज राही यांनी केले.