मोताळा (जि.बुलडाणा): भरधाव दुचाकी झाडावर आदळून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बोराखेडीनजीक अंत्री फाट्यावर २0 जानेवारीला रात्री घडली. फर्दापूर येथील रमेश ङ्म्रीराम व्यवहारे हे दुचाकीने मोताळय़ाकडून फर्दापूरकडे जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी निंबाच्या झाडावर आदळली. यात व्यवहारे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बुलडाण्याला नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दुचाकी झाडावर आदळली; एक ठार
By admin | Updated: January 22, 2016 01:44 IST