याप्रसंगी आ. संजय गायकवाड यांनी मोताळा तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. तालुक्यामधील गावे पाणीटंचाई मुक्त करू, असेही सांगितले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमींची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक ठिकाणी व्यायाम शाळांची कामे प्रगतीपथावर आहेत. मोताळा शहरामध्ये जवळपास दोन कोटी रुपयांची कामे मंजूर झालेली आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गतसुद्धा तालुक्यातील रस्त्यांची कामे मार्गी लागलेली आहेत. असंख्य कामे पुढील काळामध्ये होणार असून, यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, तालुकाप्रमुख रामदास चौथनकर, ज्येष्ठ पदाधिकारी बाळा भाऊ नारखेडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण निमकर्डे, स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर वाघ, पंचायत समिती उपसभापती रावसाहेब देशमुख, युवा सेना तालुकाप्रमुख विश्वंभर लांजुळकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख रणजित राजपूत, युवासेना विभाग प्रमुख वैभव पाटील, प्रवीण जाधव, शाम पवार, विजय दुरणे, तरोडा येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. (वा. प्र.)
जल जीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:34 IST