नानासाहेब कांडलकर/ जळगाव (बुलडाणा)जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा निकालाने भारिप-बमसं व काँग्रेसचेही हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचे स्वप्न पुन्हा भंग पावले आहे. काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या संख्येत मोठी घट झाल्याने या पक्षावर चिंतनाची वेळ आली आहे. या पृष्ठभूमीवर चारही बाजूंनी कोंडीत असलेल्या डॉ. संजय कुटे यांनी मात्र चक्रव्यूहाचा भेद करीत हॅट्ट्रिक नोंदवली. ही त्यांच्या विकासकामांना जनतेने दिलेली पाव तीच आहे. भारिप-बमसंचे उमेदवार प्रसेनजित पाटील यांना व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांंना तसेच समाजबांधवांना यावेळी विजयश्री मिळणारच, असा ठाम विश्वास होता. त्यामुळे निकालापूर्वीच काहींनी आनंदोत्सवसुद्धा साजरा केला. परंतु, विजयाने पुन्हा एकदा हुलकावणी दिलीच. त्यांना साधारणपणे अपेक्षित असणारी मते मिळाली. परंतु, डॉ.कुटे हे त्यापेक्षाही जास्त मतांपर्यंत पोहोचले. मागच्या निवडणुकीपेक्षा पाटील यांना १४ हजार मते जास्त आहेत, तर डॉ. कुटे हेसुद्धा साडे चौदा हजार मते अधिक घेण्यात यशस्वी झाले आहे त. रामविजय बुरूंगले यांना मागच्या निवडणुकीपेक्षा सात हजार मते त्यांना यावेळी कमी मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार तर फक्त सात हजार मतांवरच थांबले.
भारिप, काँग्रेसचे स्वप्न पुन्हा भंगले
By admin | Updated: October 20, 2014 00:09 IST