मागील वर्षी कर्ज वाटप ९.६४ कोटी, तर या वर्षी १२.२ कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे. एकूण व्यवसाय मागील वर्षी ८९.६ कोटी झाला होता. त्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन मार्च अखेरीस व्यवसाय ११०.६९ कोटी आहे. त्याच बरोबर मागच्या वर्षात २० लाख रुपये एवढा नफा होता. ३१ मार्च रोजीचा नफा ४२ लाख ८६ हजार रुपये असून एनपीए शून्य टक्के आहे. विशेष मागील वर्षीच्या तुलनेत संस्थेने उत्तम कामगिरी केली असली तरी कोरोना संक्रमणाचा कर्ज वसुलीवर मोठा परिणाम जाणवला. कोरोनाच्या काळात संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाने मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत ग्राहकांना उत्तमसेवा दिली. त्या मुळेच संस्थेने प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला. या वेळी संस्थेच्या सभासद, ठेवीदार, कर्जदारांनी संस्थेच्या संचालकांवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बबनराव गिऱ्हे यांनी आभार मानले. (वा.प्र.)
जगदंबा ग्रामीण पतसंस्थेची भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:34 IST