शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

अनाेळखी मुलीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:25 IST

संदीप वानखडे / बुलडाणा सर्वसामान्य लाेकांची विविध मार्गांनी फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांनी नवीनच प्रकार सुरू केला आहे़ फेसबुकवरून मुलीच्या ...

संदीप वानखडे / बुलडाणा

सर्वसामान्य लाेकांची विविध मार्गांनी फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांनी नवीनच प्रकार सुरू केला आहे़ फेसबुकवरून मुलीच्या नवाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर व्हाॅट्सॲप क्रमांकाची मागणी केली जाते़ त्यानंतर व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग सुरू हाेते़ जिल्ह्यात अशी तक्रार दाखल झाली नसली तरी अनेक जणांची अशी फसवणूक झाली आहे़ बदनामीच्या भीतीने कुणीही तक्रार करण्यास येत नसल्याचे चित्र आहे़ सायबर सेलने याविषयी नागरिकांची ऑनलाईन जागृती सुरू केली आहे़

ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर भामटे विविध फंडे वापरतात़ गत काही वर्षांपासून फसवणुकीच्या या प्रकाराबाबत जनजागृती हाेत आहे़ त्यामुळे सायबर भामट्यांनी नवीन मार्ग निवडला आहे़ फेसबुक तरुण, मध्यमवर्गीय लाेकांना सुंदर मुलीचा फाेटाे असलेल्या प्राेफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात येते़ ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर मुलीच्या नावाने संदेशाचे आदान प्रदान सुरू हाेते़ यादरम्यान, व्हाॅट्सॲप क्रमांक मिळवून त्यावरही व्हिडिओ काॅल सुरू हाेतात़ व्हिडिओ काॅलदरम्यान शुटिंग करून त्याची रेकाॅर्डिंग संबंधित व्यक्तीला पाठवून पैशांची मागणी करण्यात येते़ वेगवेगळ्या क्रमांकांवरून फाेन करून संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यात येते़ अनेक जण बदनामीच्या भीतीने मागेल तेवढे पैसे संबंधितांच्या खात्यात टाकतात़ शिवाय कुणाला काहीही सांगत नसल्याने सायबर भामट्याचे फावते़ त्यामुळे बुलडाणा सायबर सेलच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे़ फेसबुकवर अनाेळखी मुलींची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती स्वीकारू नये, असे आवाहन सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे़

अशी करतात फसवणूक

फेसबुकवरून संदेशाचे आदानप्रदान केल्यानंतर तुम्हाला व्हाॅट्सॲप क्रमांक विचारतात़ व्हाॅट्सॲपवर व्हिडिओ काॅल सुरू हाेतात़ या काॅलदरम्यान उत्तेजित करून आपले नग्न फाेटाे, व्हिडिओ रेकाॅर्डिंग करण्यात येते़ त्यानंतर ती रेकाॅर्डिंग संबंधिताला पाठवून व्हायरल करण्याची भीती दाखवण्यात येते़ व्हिडिओ नातेवाइकांपर्यंत पाठवण्याची भीती दाखवण्यात येते़ त्यामुळे त्यांच्या जाळ्यात अनेक जण फसतात़ तसेच त्यांनी मागितलेले पैसे अनेक जण देऊन टाकतात़

तक्रार दाखलच करीत नाहीत

अनेक जण व्हिडिओमध्ये असल्यामुळे फसवणूक झाली तरी पाेलीस स्टेशन किंवा सायबर सेलकडे तक्रार देत नाही़ जणही बाब कुणालाही सांगत नाही़ त्यामुळे सायबर भामट्यांचे फावते़ जिल्ह्यात असे अनेक प्रकार घडले असले तरी तक्रार मात्र एकही तक्रार दाखल झालेली नाही़

अशी घ्यावी खबरदारी

अनाेळखी मुलीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास स्वीकारू नये़

चुकून फ्रेंड रिक्वेट स्वीकारली तरी त्या मुलीला प्रतिसाद देऊ नये़

फसवणूक झाल्यास तातडीने जवळचे पाेलीस स्टेशन किंवा सायबर सेलकडे तक्रार करावी़

फेसबुकवर अनाेळखी मुली फ्रेंड रिक्वेट पाठवतात़ त्यानंतर व्हाॅट्सॲपवर व्हिडिओ काॅल करून उत्तेजित करतात़ नग्न व्हिडिओ काॅलचे रेकाॅर्डिग करून ब्लॅकमेल करतात़ त्यामुळे अशा फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये़ फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार दाखल करावी़ सायबर सेलकडून याविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे़

प्रदीप ठाकूर, पाेलीस निरीक्षक, सायबर सेल, बुलडाणा