शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलापासून लाभार्थी वंचित

By admin | Updated: December 13, 2014 00:14 IST

लोणार तालुक्यातील प्रकार; जिल्हाधिका-याच्या आदेशाला केराची टोपली.

लोणार (बुलडाणा): समाज कल्याण विभागामार्फत रमाई आवास आणि इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांंंची अंतीम निवड करण्यासाठी खर्‍या लाभार्थ्यांंना ५ हजार रुपये लागत असल्याची माहिती आहे. त्यावरुन जिल्हाधिकारी आणि उपमुख्यकार्यपालन अधिकारी जि.प. बुलडाणा यांनी पंचायत समितीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन ५ डिसेंबर पर्यंंंत अहवाल पाठविण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना १ डिसेंबर रोजी दिले होते. मात्र लोणार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रणदिवे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रास केराची टोपली दाखवून याप्रकरणी कोणतीही चौकशी न करता दोषी कर्मचार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रकार केला आहे.दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना राहण्यासाठी पक्के घरकुल मिळावे, यासाठी शासनाकडून रमाई आणि इंदिरा आवास योजनेतून १ लाख रु पयाचे अनुदान लाभार्थ्यांंंना वाटप करण्यात येतात. परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांनी ५ ते ७ हजार रुपये मोजले त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. खरे लाभार्थी मात्र योजनेपासून वंचित राहत आहेत. इंदिरा आणि रमाई आवास योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांंंना नियमांची पूर्त ता करुन घरकुल देण्याची शासनाची योजना आहे. यातून सर्वसामान्य गरीब कुटूंबांना देखील शासनाच्या १ लाख रुपयांच्या अर्थसहाय्यातून हक्काचे पक्के घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करता येते. मात्र लोणार पंचाय त समिती अंतर्गत ही योजना फक्त धनदांडग्यांसाठी राबविली जात आहे. गावातील योग्य आणि गरीब कुटूंबाची निवड करण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर टाकण्यात आली. मात्र सरपंच, ग्रमासेवक आपल्या अधिकाराचा गैरफायदा उचलून प्रतिक्षा यादीत पैसे मोजणार्‍यांच्या नावाचा समावेश करुन खर्‍या लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली. नियमानुसार पात्र ठरतांना सुद्धा केवळ घरकुलासाठीचे कमिशन न दिल्याने हे लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित आहे. याचा तालुक्यातील गावागावातून सर्वे झाल्यास बरेच वास्तव उघड होईल. तालुक्यात रमाई आणि इंदिरा आवास योजना राबवितांना झालेल्या गैर प्रकाराची सविस्तर चौकशी करुन अहवाल सादर करावे. तसेच दोषी असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश असतांना सुद्धा गटविकास अधिकारी रणदिवे यांच्याकडून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार होत आहे, हे विशेष.