बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे निलंबन शुक्रवारी मागे घेण्यात आले. अर्थसंकल्प सादर करीत असताना गोंधळ घातल्याचा ठपका ठेवीत १९ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. २२ मार्च रोजी विधानसभेचे अधिवेशन सुरू होताच संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी या आमदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा प्रस्ताव मान्य करीत १९ आमदारांना निलंबित केले होते. यामध्ये बुलडाण्याचे आमदार सपकाळ यांचा समावेश होता. शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका कायम राहणार!शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठविला होता. मात्र, कर्जमाफी तर सोडाच आमदारांना निलंबित करण्यात आले. निलंबन ही राजकीय आकसापोटी केलेली कारवाई होती. त्यामागे राजकारण होते. तर निलंबन मागे घेण्यामागे ही राजकारणच आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण अखेरपर्यंत लढा देणार असून, शेतकरी हिताची आपली भूमिका कायम राहणार असल्याचे मत आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.
हर्षवर्धन सपकाळ यांचे निलंबन मागे
By admin | Updated: April 8, 2017 00:09 IST