मोताळा : जंगलातून भटकलेले अस्वल गावात घुसले व लोकांनी त्याला घरात कोंडून टाकले. हा प्रकार आज तरोडा येथे घडला. दरम्यान वन विभागाच्या अधिकार्यांना माहिती दिल्यानंतरही अधिकारी रात्री उशीरा गावात पोहचले. या कर्मचार्याजवळ अस्वलाला पकडण्यासाठी कोणतेही साधन नसल्यामुळे ते केवळ हातावर हात टाकून बसून होते. सोमवारी दुपारी ४ वाजता तरोडा गावात अस्वल शिरले.लोकांनी आरडा ओरड केल्याने हे अस्वल मोतिसिंग धीरबस्सी यांच्या घरात घुसले. लोकांनी घराला बाहेरून कुलुप लावून वन अधिकार्यांना माहिती दिली. मात्र नेहमी प्रमाणे कर्मचारी उशिरा आले. मात्र त्यांच्याजवळ अस्वल पकडण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. शेवटी पिंजरा मागविला परंतु रात्री उशिरापर्यंत अस्वल पकडण्याचा पिंजरा गावात पोहचला नव्हता त्यामुळे गावात दहशत पसरल होती.
अस्वल चार तास घरात बंद
By admin | Updated: July 7, 2014 22:29 IST