शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंगळी शिवारात आढळले अस्वल!

By admin | Updated: September 26, 2016 02:42 IST

वन विभागाचे कर्मचारी तब्बल तीन तास उशिरा घटनास्थळी दाखल.

बोरखेड(जि. बुलडाणा), दि. २५- परिसरातील पिंगळी शेतशिवारात रविवारी संध्याकाळी अस्वल आढळून आले. यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर तब्बल तीन तास उशिराने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.सोनाळा येथील शेतकरी विजय तुळशीराम अहिर यांचे पिंगळी शिवारात शेत आहे. रविवारी शेतात काम करीत असताना संध्याकाळी ६.१५ वाजताचे सुमारास विजय अहिर यांना शेतातील निंबाच्या झाडावर अस्वल बसले असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती त्यांनी सोनाळा तसेच जळगाव जामोद येथील वनविभागाला दिली. मात्र, तब्बल तीन तासाने सोनाळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एम.झेड. काझी व वनविभागाचे पथक घटनास्थळी आले. रात्र असल्याने अस्वल पकडणे शक्य नाही, असे सांगून हे पथक मोकळे झाले. दरम्यान, अस्वल असल्याची माहिती पसरताच शेतात बघ्यांची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे याच शिवारात १४ सप्टेंबर रोजी अस्वल आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले होते. अनेकांनी शेतात जाणे बंद केले होते. याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतरसुद्धा वन विभागाला अस्वलास पकडण्यास अपयश आले होते. यानंतर २२ सप्टेंबर रोजी याच परिसरात मृत अस्वलाचे अवयव आढळून आले होते. तसेच याप्रकरणी शेतकर्‍यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वलाचा बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी ठरत असल्याने शेतकर्‍यांसोबतच शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत. तेव्हा वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहून अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.