शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लिहित्या, वाचत्या, विचारकर्त्या व्हा : नीरजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 16:01 IST

राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ‘‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, तर आपल्या जगण्याचा विचार, आत्मभान जगवण्याचा मार्ग, स्वत: ची स्वप्नं मनापासून जगण्याचा मार्ग आहे. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यातील व्यक्ती शोधणे, स्वत्व शोधणे आहे. ते शोधा आणि लिहित्या, वाचत्या विचारकर्त्या व्हा’’, असे आवाहन मुंबई येथील कवयित्री, लेखिका नीरजा यांनी केले.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि प्रगती सार्वजनिक वाचनालय बुलडाणा यांच्या पुढाकाराने २५ आॅगस्ट रोजी आयोजित राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. शहरातील गर्दे वाचनालय सभागृहातील ताराबाई शिंदे साहित्यनगरीत संमेलनाचा एकदिवशीय दिमाखदार सोहळा विविध सत्रांमध्ये पार पडला. यावेळी नीरजा यांनी ५० मिनीटांच्या भाषणात विविध विषयांना हात घातल व्यवस्थेने आपल्यावर सोपविलेल्या चुकीच्या परंपरा फोडून त्यातून बाहेर पडा व पुरुषी व्यवस्थेत आपल्या जगण्याला अर्थ द्या, असे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले.यावेळी स्वागताध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या प्रभाताई चिंचोले, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद, अहमदनगर येथील दिशा पिंकी शेख, मुंबई येथील ज्योती आंबेकर आदींसह साहित्यिक, साहित्यप्रेमी रसिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ग्रंथदिंडी व उद्घाटनासह विविध सहा सत्रांमध्ये हा सोहळा पार पडला. बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळसह राज्यातील अनेक भागातून महिला लेखिका, कवयित्रींचा मेळा या संमेलनासाठी जमला होता. संमेलनाचे संयोजन नरेंद्र लांजेवार व कार्यकारिणीच्या सदस्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. संमेलनाचे उद्घाटन ही लक्षवेधी ठरले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक