शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तींपासून रक्षणासाठी सजग राहा!

By admin | Updated: May 30, 2017 00:19 IST

जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आगामी पावसाळा लक्षात घेता जिल्ह्यात पूर परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास कुठलीही जीवित हानी किंवा वित्त हानी होऊ नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी बचावासाठी सज्ज रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सूनपूर्व तयारींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, तहसीलदार शैलेश काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्यासह विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या बचावासाठी महसूल विभागाने तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्ज रहावे. बचावाच्या अनुषंगाने लाइफ बोट, लाइफ मन, दोर तसेच आवश्यक बाबींची तपासणी करून मुख्यालयी साधनसामग्री तयार ठेवावी. संचार व्यवस्था, स्थलांतर, शोध व बचाव, वैद्यकीय प्रतिसाद व ट्रामा केअर यासारख्या सुविधा तातडीने उपलब्ध होईल, याचे अगोदरच नियोजन करावे. अतिवृष्टी झालीच तर महसूल विभागाने त्या भागात जाऊन तातडीने पंचनामे करून कार्यपूर्ती अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. ते पुढे म्हणाले, जलसंपदा विभागाने प्रकल्पात किती जलसाठा आहे, याची तपासणी करावी. तसेच अतिवृष्टी झाल्यास प्रकल्पांमध्ये अधिक किती जलसाठा सामावून राहील, याची २४ तास निगराणी तपासणी करावी. त्यासाठी विशेष चमू नियुक्ती करावी. महसूल विभागाने पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची भौगोलिक स्थिती जाणून तशा प्रकारची बचावात्मक कार्यवाही ग्रामपंचायत व तालुका स्तरावर प्रथमच करून ठेवावी. पूर बाधित जीवनावश्यक वस्तूंचे साठवणूक, आरोग्य सुविधा, तात्पुरत्या निवासाची सोय आदी बाबींचे नियोजन करावे. गाव तलाव, पाझर तलाव तसेच एखाद्या प्रकल्पातून परत येणाऱ्या (बॅक वॉटर ) मुळे प्रभावित होणाऱ्या गावांची यादी तयार करावी. त्या ठिकाणी बचावात्मक सुविधांचे नियोजन करुन सज्ज ठेवाव्यात. पिण्याच्या पाण्यासंदर्भात सूचना देताना जिल्हाधिकारी पुलकुंडवार म्हणाले, पावसामुळे पिण्याचे पाणी दूषित होते व रोगराई पसरते. यापासून संरक्षण मिळावे व नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायत व तहसील कार्यालयात ब्लिचिंग पावडरचा पुरेसा पुरवठा असावा. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांची उपलब्धता करून ठेवावी, आदी सूचना पुलकुंडवार यांनी दिल्या.