शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बॅटरी चोरणारी टोळी संग्रामपुरात जेरबंद

By admin | Updated: November 22, 2015 02:06 IST

मध्यप्रदेशातील दोन आरोपी अटक; तीन फरार.

संग्रामपूर ( बुलडाणा ) : मोबाइल टॉवरवरील बॅटरी चोरणार्‍या मध्यप्रदेशातील खरगोन जिल्हय़ातील टोळीतील ५ आरोपींपैकी २ आरोपींना आयशर कंपनीच्या एमएच 0४ डीडी ११५ या चारचाकी वाहनासह सोनाळा पोलिसांनी २१ नोव्हेंबरला पहाटे अटक केली.दरम्यान, त्यांच्याकडून १ लाख ८ हजार रुपयांच्या १८ बॅटर्‍यांसह चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. ठाणेदार सचिनसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक जोशी, रायटर श्याम कपले यांनी ही कारवाई केली. कारवाईदरम्यान दोन जणांना अटक करण्यात आली तर तीन जण फरार होण्यात यशस्वी झाले. जामोद परिसरात ही कारवाई करण्यात आली.अटक करण्यात आलेल्यामध्ये वाहनाचा चालक आपसिंग दशरथ डावल (३२), विजय रामसिंग बडोले (वय २५ दोघे. रा. जुना पाणी बडवा, जि. खरगोन मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. रात्र गस्तीदरम्यान लाडणापूर, जामोद भागात चोरी होत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार परदेशी यांना मिळाली होती. तसेच लाडणापूर येथील ग्रामस्थांनी परदेशी यांनाही भ्रमणध्वनीद्वारे, लाडणापूर गावाजवळील मोबाइल टॉवर जवळची बॅटरी चोरी केली जात असल्याची माहिती दिली होती. दरम्यान, चोरीचा प्रयत्न होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याचे चोरट्यांना समजताच त्यांनी तेथून काठता पाय घेतला. त्यामुळे ठाणेदार परदेशी यांनी लाडणापूरकडून जळगाव जामोदकडे जाणार्‍या रस्त्यावर नाकाबंदी केली असता त्यांना उपरोक्त आयशर गाडीचा चालक संशयास्पद स्थितीत जामोद येथे मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत बॅटरी चोरणारा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सोबतच पोलिसी खाक्या दाखवताच सहकारी शेतात पळाले असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र साळुंके व जळगाव जामोदचे ठाणेदार विजय पाटकर यांच्या मदतीने ठिकठिकाणी नाकाबंदी करून आणखी एका आरोपीस करमोडा ते लाडणापूर रस्त्यावरील एका झोपडीजवळ अटक करण्यात आली. सोनाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.