शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी मुद्र योजनेअंतर्गत कर्ज वितरणाचे उद्दीष्ट पूर्ण करावे; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 14:31 IST

बुलडाणा : स्वयंरोजगार उभारण्याकरीता मुद्रा बँक योजना अत्यंत विश्वसनीय योजना आहे. या योजनेतून किशोर व तरूण या वयोगटात कर्ज देण्यात येते. अनेक तरूण स्वयंरोजगार उभारण्यासाठी बँकाकडून कर्ज मिळण्यासाठी धडपड करीत असतात. मुद्रा बँक योजना त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. या योजनेतंर्गत राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करीत तातडीने कर्ज वितरण करावे, ...

ठळक मुद्देमुद्रा बँक समन्वय समिती बैठक

बुलडाणा : स्वयंरोजगार उभारण्याकरीता मुद्रा बँक योजना अत्यंत विश्वसनीय योजना आहे. या योजनेतून किशोर व तरूण या वयोगटात कर्ज देण्यात येते. अनेक तरूण स्वयंरोजगार उभारण्यासाठी बँकाकडून कर्ज मिळण्यासाठी धडपड करीत असतात. मुद्रा बँक योजना त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. या योजनेतंर्गत राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करीत तातडीने कर्ज वितरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शनिवारी घेतली.     मुद्रा बँक योजना प्रचार प्रसार समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सोनार, कौशल्य विकास व रोजगार विभागाचे सहायक संचालक चिमणकर, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रभाकर श्रोते यांच्यासह बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.   मुद्रा बँक योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार करण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, मुद्रा योजनेतून युवकांनी स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळवावे. बँकांनी होतकरू तरूणांना मुद्रा योजनेतून कर्ज वितरणाची प्रकरणे मंजूर करावीत. तसेच तरूण गटातील प्रकरणांनाही मोठ्या प्रमाणावर मंजूरात द्यावी. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी मुद्रा योजनेची माहिती दिली.  नाबार्डचे श्री. बोंदाडे यांनी बँकनिहाय मुद्रा बँक कर्ज वितरणाचा आढावा घेतला.  यावेळी स्टेट बँक आॅफ इंडियाचे  मोहता, महाराष्ट्र बँकेचे मुरकुटे यांच्यासह राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :bankबँक