शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजार रुपयांचे बँक खाते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST

शालेय विद्यार्थ्यांना दरदिवशी पोषण आहार वाटप केला जातो. मात्र, कोरोनामुळे यंदा शाळा भरल्या नाहीत. त्यामुळे आहार न शिजवता धान्य ...

शालेय विद्यार्थ्यांना दरदिवशी पोषण आहार वाटप केला जातो. मात्र, कोरोनामुळे यंदा शाळा भरल्या नाहीत. त्यामुळे आहार न शिजवता धान्य वाटप करण्यात आले. आता तर धान्यही न देता पोषण आहाराचे पैसेच थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. उन्हाळ्यात शाळांना सुटी असली, तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक आहे. यंदा शाळा बंद असल्याने काही काळ आहाराऐवजी धान्य वाटप करण्यात आले. मात्र, उन्हाळ्यात धान्य वाटपही शक्‍य झाले नाही. त्यामुळे आता या आहाराचे थेट पैसेच

लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टाकले जाणार आहेत. त्यासाठी मुलांचे बँक खाते काढण्याकरिता एक हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागत आहे.

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - १५६ रुपये

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - २३४ रुपये

जिल्ह्यातील पात्र लाभार्थी

पहिली ते आठवी विद्यार्थी: २६८१९४

शाळा: १९९८

बँकेत खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये

प्रतिविद्यार्थी दरमहा दीडशे ते अडीचशे रुपयांपर्यंत

उन्हाळी सुटीतील आहाराचे पैसे मिळणार आहेत. मात्र यंदा शाळा

ऑनलाईन भरणार असल्यामुळे २०२१-२०२२ या शैक्षणिक सत्रातील आहाराऐवजी धान्य मिळणार की डीबीटीद्वारे पैसेच मिळणार, याबाबत संभ्रम कायम आहे. पोषण आहारासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची अद्ययावत माहिती तयार ठेवण्याचे नियोजन सुरू आहे. ज्यांचे बँक खाते अद्याप उघडले गेले नाही, अशा विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी शाळांनी सहकार्य करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे.

सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

पालकांची डोकेदुखी वाढली

उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता ते अनुदान बँक खात्यात जमा करण्याचा शासनाचा निर्यय पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आता विद्यार्थ्यांचे बँक खाते काढावे लागत आहे. सध्या बँकेत पीक कर्जाची गर्दी आहे. त्या विद्यार्थ्याचे बँक खाते काढण्यासाठी पालक गेल्यानंतर त्यांना परत जावे लागत आहे.