बुलडाणा : मतदान संपल्यानंतर बुधवारी संध्याकाळीच उमेदवारांनी बुथनिहाय आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात केली होती. या आकडेवारीचे वेिषण, कार्यकर्त्यांसोबत चर्चा व निवडणूक काळात मदत करणार्या लोकांचे आभार व्यक्त करण्यासाठी गाठी-भेटी घेण्या तच गुरुवारी उमेदवार व्यस्त होते. बुलडाणा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजयराज शिंदे यांनी आज सकाळपासून निवडणुकीमध्ये मदत करणार्या शहरातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. राहत्या घराशेजारी अनेकांच्या घरी जाऊन आभार मानले व दुपारी बुथनिहाय आकडेवारी घेऊन ठराविक कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्याचे दिसून आले. काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. गावागावातून मतदानाच्या आकडेवारीबाबत चर्चा करत दुपारी ते स्वत:च्या घराचे सुरू असलेले बांधकाम पाहण्यासाठी गेले. भाजपचे उमेदवार योगेंद्र गोडे यांनी कालच बुथनिहाय आकडेवारीनुसार कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. आज मतदारसंघातील अनेक गावांमधून त्यांच्याकडे कार्यक र्ते आले होते. दुपारपर्यंत त्यांच्याशी चर्चा करत ते आभार व्यक्त करीत होते. मनसेचे संजय गायकवाड यांच्याकडे कार्यकर्त्यांचा उत्साह मोठय़ा प्रमाणात दिसून आला. इंजिन जोरात चालले, असाच कार्यकर्त्यांचा सूर होता. तर राष्ट्रवादीचे नरेश शेळके यांनी पदाधिकार्यांसोब त चर्चा करून बुथनिहाय मतदानाचा अंदाज घेतला. खामगाव मतदारसंघात काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांचा दिवस व्यस्त होता. तर भाजपचे अँड.आकाश फुंडकर हे गावागावातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना दिसून आले. जळगाव जामोदमध्ये डॉ.संजय कुटे यांनी दुपारपर्यंंत कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून जिल्हाध्यक्ष या नात्याने भाज पच्या इतर मतदारसंघातील उमेदवारांसोबत फोनद्वारे चर्चा केली. काँग्रेसचे रामविजय बुरुंगले यांनी त्यांचे बंधू शिवाजीराव बुरुंगले यांच्यासह मतदारांचे आभार मानण्यासाठी गाठी-भेटी घेतल्या. भारिप-बमसंचे प्रसेनजित पाटील यांनी कार्यालयात बसून सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांसोबत संवाद साधला आणि मतमोजणीच्या दिवशीचे नियोजन केल्याचे सांगि तले.मेहकर मतदारसंघात शिवसेनेचे डॉ.संजय रायमुलकर यांनी जगदंबा देवीच्या महाप्रसाद वि तरणाला हजेरी लावून तेथेच मतदारांशी संवाद साधला. काँग्रेसचे लक्ष्मणदादा घुमरे, राष्ट्रवादीच्या अश्विनीताई आखाडे यांनीही निवडणुकीत मदत करणार्यांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी गाठीभेटी घेतल्या. सिंदखेडराजा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ.शशिकांत खेडेकर यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत आढावा घेतला. मनसेचे विनोद वाघ हे सकाळपासून तरुणांच्या गराड्यात मतदानाचा कौल जाणून घेत होते. राष्ट्रवादीच्या रेखाताई खेडेकर, भाजपचे डॉ.गणेश मान्टे व काँग्रेसचे प्रदीप नागरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मलकापूर मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.अरविंद कोलते यांनी विविध गावांना भेटी देऊन चर्चा केल्याचे दिसून आले. जवळपास सर्वच मतदारसंघात उमेदवारांनी मतदानाच्या आकडेवारीचे वेिषण केले. अनेक उमेदवारांसोबत संपर्क होऊ शकला नाही; मात्र सर्वांनीच गाठीभेटी घे त आजचा दिवस व्यस्त ठेवल्याचे जाणवले.
गाठी-भेटी, आकडेमोडीत उमेदवार व्यस्त
By admin | Updated: October 17, 2014 00:39 IST