शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांनी अनुभवला बालाजींचा कल्याणोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 15:21 IST

शेकडो भाविकांनी बालाजी महाराजांच्या कलोणोत्सवाचा सोहळा अनुभवला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राजूर घाटातील व्यंकटगिरी पर्वतावरील बालाजी मंदिरात ३० नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या ब्रह्मोत्सवाची ३ डिसेंबरला महाप्रसादाने सांगता होणार आहे. २ डिसेंबर रोजी ब्रह्मोत्सवातील विशेष आकर्षण असलेला बालाजींचा कल्याणोत्सव अर्थात श्रीदेवी, भूदेवी सोबत बालाजी महाराजांचा विवाह सोहळा पार पडला. शेकडो भाविकांनी बालाजी महाराजांच्या कलोणोत्सवाचा सोहळा अनुभवला.व्यंकटगिरीवर ३० नाव्हेंबर रोजी छप्पनभोेग प्रसादाने ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली. १ डिसेंबर रोजी दुपारी आळंदी येथील महाराष्ट्र वारकरी प्रबोधन महासमितीचे कार्याध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री यांचे प्रवचन पार पडले. २ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते १२ यावेळेत विविधी धार्मिक विधी आणि यज्ञ पार पडला. तर दुपारी संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज प्रा. बाळासाहेब ज्ञानेश्वर माऊली देहूकर महाराज यांचे प्रवचन पार पडले. आपल्या अमोघ आणि ओघवत्या वाणीने त्यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले होते. भक्तीचा मार्ग हाच खरा यशाचा आणि जिवनाच्या कल्याणाचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.सायंकाळी सात वाजता ब्रह्मोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला बालाजींचा कल्याणोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी श्रीदेवी, भूदेवी सोबत बालाजी महाराजांचा विवाह विवाह विधीवत पार पडला. बालाजी सेवा समितीचे सर्व सदस्य सपत्नीक या सोहळ्यात सहभागी झाले होते. शिवाय शहरासह पंचक्रोषीतील इतर दाम्पतदेखील या विवाहसोहळ्याला उपस्थित होते. मंत्रोपचार, पूजा आणि विवाहाच्या तंत्रशुद्ध विधीने हा सोहळा पार पडला. या ब्रह्मोत्सवामध्ये भाविकांची मांदियाळी जमली होती.मंगळवारी ३ डिसेंबर रोजी या उत्सवाची सांगता होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता १०८ कलशाभिषेक होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत प्रा. बाळासाहेब ज्ञानेश्वर माऊली देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि त्यांनतर महाप्रसाद वितरणास सुरूवात होणार आहे. दरवर्षी महाप्रसादासाठी हजारो भाविकांची येथे गर्दी होते. यावर्षी देखील बालाजी सेवा समितीच्या वतीने महाप्रसादाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांनी कलाशाभिषेक, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालाजी सेवा समितीचे अध्यक्ष अरुण दिवटे यांनी केले आहे. 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIndian Traditionsभारतीय परंपरा