शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
2
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
3
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
4
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
5
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
6
"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल
7
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
8
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
9
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
10
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
11
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
12
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
13
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
14
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
15
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
16
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
17
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
18
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
19
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
20
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट

बालाजी महाराजांची यात्रा रद्द; चारशे वर्षांची परंपरा होणार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 1:37 PM

Balaji Maharaj's Yatra canceled घटस्थापना, मंडपोत्सव, लळीत उत्सव आणि यात्रा हे सर्व उपक्रम यावर्षी आता साजरे करता येणार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क             देऊळगाव राजा:  विदर्भाचा तिरुपती बालाजी म्हणून लाखों भाविकांच्या हृदयात जागृत देवस्थान म्हणून स्थान असलेल्ल्या देऊळगाव राजातील श्री बालाजी महाराजांच्या यात्रा उत्सवाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांनी परवानगी नाकारल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. चारशे वर्षांपासून अखंडितपणे देऊळगाव राजा शहरात अश्विन कार्तिक महिन्यात बालाजी महाराज यात्रा महोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो, घटस्थापना, मंडपोत्सव, लळीत उत्सव आणि नंतर आठवडी बाजाराच्या जागेत भरणारी यात्रा हे सर्व उपक्रम यावर्षी आता साजरे करता येणार नाहीत.यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी गुरूवारी आदेश जारी करताना ३१ ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यात सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, मनोरंजन, सांस्कृतिकसह मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.  सोबतच १७ ऑक्टोबर ते १० डिसेंबर  या कालावधीत साजरा होणारा बालाजी महाराज यात्रा महोत्सव स्थगित करण्याचे आदेश देत मंदिराच्या आतील भागात आवश्यक पुजा अर्चा व विधी पूर्ण करण्यासाठी फक्त दहा लोकांना परवानगी दिलेली आहे. जगाच्या पाठीवर कुठेही साजरा न होणारा एकमेव लळीत उत्सव येथे साजरा होतो. तोही यावर्षी होणार नसल्याचे  स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeulgaon Rajaदेऊळगाव राजाIndian Traditionsभारतीय परंपरा