शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे आता नवे पर्व, दिशा अभियान

By admin | Updated: July 11, 2017 00:20 IST

जिल्हाभर राबविणार उपक्रम : घरोघरी लावणार ‘बेटी बचाओ’चा संदेश देणारे पत्र

किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमांतर्गत ‘नवे पर्व, नवी दिशा, नवे संकल्प’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात जागतिक लोकसंख्या दिन ११ जुलैचे औचित्य साधून करण्यात येणार असून, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश देणारे पत्र घरोघरी लावण्यात येणार आहेत. मुलींच्या जन्मदरात होत असलेली घट हा चिंतेचा विषय ठरत आहे. मागील काही वर्षांतील आकडेवारीवरूनच ही गंभीर समस्या समोर आली आहे. सुरुवातीपासूनच मुलींच्या जन्मदरात घट होतच आहे, पण, समाजात याबाबत जागरूकता राहिली असती, तर आज मुलींच्या जन्मदराबाबत जे काही भयान चित्र दिसत आहे, ते दिसले नसते. लोकसंख्या वाढीस आळा घालणे हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून शासन चालत होते. लोकसंख्या वाढीला नियंत्रण करणे हेच एकमेव उद्दिष्ट शासनाने ठेवले. यामुळे मुलींच्या जन्मदराकडे तितकेसे लक्ष दिले गेले नाही. यामुळे गर्भलिंग चाचणी करून जन्माआधीच तिची जीवनयात्रा संपविणे हे सर्रास सुरू होते. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सरकारने अनेक योजना राबविल्या, त्यात एकात्मिक बाल विकास योजना ही देशातील सर्वात मोठी योजना आहे. १८ हजार कोटींहून अधिक खर्च या योजनेत केला जातो. या योजनेच्या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता, ० ते ६ वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्याकडे अधिक लक्ष दिले जाते. तरीही पाहिजे तसा मुलींचा जन्मदर वाढलेला दिसून येत नाही. यामुळे ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली व तालुकास्तरीय पदाधिकारी, अधिकारी यांचे सहकार्याने मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांना भेटी व मार्गदर्शन देऊन १९३४ लायक जोडप्यांना आरोग्य विभागामार्फत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वाक्षरीचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आवाहन पत्र देण्यात येणार आहे. तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमांतर्गत स्टिकर्स जिल्हाभर घरोघरी लावण्याचे अभियान ११ ते २६ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गाडीवर झळकले ‘स्वागत लेकीचे’!११ जुलैपासून घरोघरी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचे पत्र लावण्यात येणार आहे. त्यानुसार मेहकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शेंदला येथील वैद्यकीय अधिकारी प्रवीणकुमार निकस यांनी आपल्या गाडीला ‘स्वागत लेकीचं, स्वागत समानतेचं’ हे स्टिकर लावून जिल्ह्यासाठी एक आशादायी चित्र असल्याचा संदेश दिला आहे. मुलींचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांना भेटीजागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली व तालुकास्तरीय पदाधिकारी, अधिकारी यांच्या सहकार्याने मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांना भेटी व मार्गदर्शन या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. त्यामध्ये १९३४ लायक जोडप्यांना आरोग्य विभागामार्फत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वाक्षरीचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे आवाहन पत्र देण्यात येणार आहे.११ ते २६ जुलैदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानात तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी यांच्यासह आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचारीही सहभागी होणार आहेत. या अभियानातून मुलींचा जन्मदर वाढण्यास नक्कीच मदत होईल.- डॉ. अनंत पबितवार, तालुका आरोग्य अधिकारी, लोणार.