शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सराफा दुकानातून २७ लाखांचा ऐवज असलेली बॅग पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 15:24 IST

दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका दहा ते १२ वर्ष वयाच्या मुलाने दुकानातून ही काळ््या रंगाची सोने असलेली बॅग पळवली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: शहरातील मुख्य बाजार पेठेतून सुमारे २७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागीने आणि रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नऊ डिसेंबर रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.भरदिवसा सिंदखेडराजा शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापारी लाईनमध्ये ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेनंतर परिसरात तातडीने नाकाबंदी केली. मात्र तोवर अज्ञात चोरटे दुचाकीवर पसरा झाल्यो सीसीटीव्ही फुटेज तपासण्यानंतर स्पष्ट झाले. सिंदखेड राजातील सराफा व्यापारी प्रदीप केशव इवरकर हे नेहमीप्रमाणे त्यांच्या कृष्णा ज्वेलर्स या दुकानात सोमवारी दुपारी दाखल झाले. दरमयान दुकानाचे एक शटर उघडून त्यांनी त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असलेली काळ््या व पांढºया रंगाच्या दोन्ही बॅग दुकानातील काचेच्या काऊंटवर ठेवत दुकानाचे दुसरे शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात माचीसच्या काड्या व फेवीक्वीक टाकण्यात आले असल्याने त्यांना हे कुलूप उघडण्यास वेळ लागला. याच दरम्यान अज्ञात चोरट्यांने त्यांच्या दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असलेली काळ््या रंगाची लेदरची बॅग लंपास केली. कुलूप उघडत असताना बॅगची आठवण झाल्याने त्यांनी दुकानात बघितले असता काळ््या रंगाची लेदरची बॅग तेथे आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी आरडा ओरड करत मदत मागितली.दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका दहा ते १२ वर्ष वयाच्या मुलाने दुकानातून ही काळ््या रंगाची सोने असलेली बॅग पळवली. सोबतच सिंदखे राजा-मेहकर मार्गावर काही अंतरावर दुचाकीवर थांबलेल्या दोन अनोळखी व्यक्तींना बॅग देत त्यांच्यासोबत तो अल्पवयीन मुलगाही तेथून पसरा झाला. चोरट्यांनी बॅग उचलल्यानंतर ती बेडसीटने झाकून पळवितांनाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या घटनेनंतर प्रदीप केशवराव इवरकर यांची प्रकृती बिघडली होती. या घटनेत चोरट्यांनी २२ लाख २३ हजार रुपयांचे ६३६ ग्रॅम सोने व चांदीचे दोन लाख ३५ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल आणि दोन लाख ५१ हजार रुपयांची रोख रक्कम असा २७ लाख नऊ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. कुलपात फेवीक्वीक व माचिसच्या काड्याअज्ञात चोरट्यांचा चोरीचा हा प्लॅन पूर्व नियोजित असल्याची शक्यता असून त्यांनी या चोरीसाठी आधी रेकी केली असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे सराफा व्यापाºयाच्या दुकानाच्या एका शटरच्या कुलूपामध्ये फेवीक्वीक आणि माचिसच्या काड्या टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे कुलूप उघडताना व्यापाºयास विलंब झाला. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे इप्सीत साध्य केले अशी चर्चा आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजा