शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रिक्तपदांचा अनुशेष वाढला

By admin | Updated: December 13, 2014 00:17 IST

जळगाव जामोद पंचायत समिती व कृषी विभागातील कामे प्रलंबित.

नानासाहेब कांडलकर / जळगाव जामोद (बुलडाणा)ग्रामीण भागासाठी व शेतकर्‍यांसाठी असणार्‍या शासकीय योजना संबंधितांपर्यंंत पोहचविण्याची जबाबदारी पंचायत समिती व कृषी विभागाची असते. जळगाव जामोद तालुक्यात या विभागांमध्ये कर्मचार्‍यांचा मोठा अनुशेष असल्याने जनतेला योजनांचा लाभ पुरविण्यास बरेचदा विलंब होतो. त्यामुळे कधी कधी जनता व अधिकारी यांच्यामध्ये संघर्षाचीही स्थिती उद्भवते.जळगाव जामोद येथील कृषी विभागाचे कार्यालय चक्क एका गोदामात थाटले आहे. या कार्यालयातील अत्यंत महत्वाचे तालुका कृषी अधिकार्‍याचे पद गत तीन वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे प्रभारी अधिकार्‍यांकडून कामकाज सुरू आहे. तसेच या कार्यालयातील सहाय्यक अधिक्षक, तीन कनिष्ठ लिपीक, दोन अनुरेखक, शिपाई व चौकीदार अशी आठ पदे रिक्त आहेत. परिणामी शेतकर्‍यांची कामे वेळेवर होत नाही. मंडळ कृषी अधिकारी एक या कार्यालयातील सुध्दा चार पदे रिक्त आहेत. यामध्ये कृषी पर्यवेक्षक, दोन कृषी सहाय्यक व अनुरेखक यांचा समावेश आहे. तर मंडळ कृषि अधिकारी दोन या कार्यालयातील मंडळ कृषी अधिकार्‍यांचेच पद रिक्त आहे. तसेच या कार्यालयातील अनुरेखक व शिपाई ही दोन पदे सुध्दा रिक्त आहेत. चार अनुरेखक पदांपैकी एकही अनुरेखक नाही. कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने अधिक्षकाचे पद हे महत्वाचे असते ते सुध्दा रिक्त आहे. सदर पदे रिक्त असल्याने शेतकर्‍यांची कामे वेळेत होत नाही तसेच शासनाच्या योजना शेतकर्‍यांपर्यंंत पोहचण्यात विलंब होतो. या रिक्त पदांबाबत आ.डॉ.संजय कुटे यांनी एक वर्षापूर्वी धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर काही पदे भरण्यात आली. परंतु काही कर्मचारी नवृत्त झाल्याने व काहींच्या बदली झाल्यामुळे कर्मचार्‍यांचा अनुशेष पुन्हा वाढला आहे. तालुका कृषी अधिकार्‍याचे पद भरण्याची गरज निर्माण झाली आहे.तसेच पंचायत समिती मार्फत ग्रामीण भागातील सर्व योजना राबविल्या जातात. जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकार्‍यांची दोन्ही पदे भरली असली तरी ग्रामविकास अधिकार्‍यांची आठ पैकी च क्क पाच पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील मोठय़ा गावांचा कारभार वार्‍यावर असल्याचे चित्र आहे. ग्रामसेवकांची सुध्दा सहा पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभार अन्य ग्रामसेवकांना सांभाळावा लागतो. ग्रामसेवकांच्या रिक्त पदांची स्थिती मागील वर्षाच्या तुलनेत सुधारली आहे. सहाय्यक प्रशासन अधिकारी यांची प्रतिनियुक्ती जिल्हा परिषद बुलडाणा येथे झाल्याने ते पद सुध्दा रिक्त आहे. याशिवाय कृषी अधिकारी सामान्य, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी सां िखकीय, विस्तार अधिकारी उद्योग ही पदे रिक्त आहेत.